ठाणे- कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये कौटुंबिक वादाच्या घटनेत आणि पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारीत वाढ झाली आहे. हे प्रकार सर्वच भागात वाढले आहेत, परंतु ठाणे शहरात जास्त प्रमाणात तक्रारी वाढल्याचे पोलीस दफ्तरी नोंद होत असलेल्या आकडेवारी वरून दिसून येत आहे.
घरगुती वादाचे तब्बल 339 गुन्ह्याची पोलीस दफ्तरी नोंद
कोरोना संकटात लॉकडाऊन लागल्याने कौटुंबिक आणि घरगुती नाते संबंधाचे वाद देखील आता पोलिसांकडे पोहचू लागले आहेत. मागील वर्षी देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण कक्ष आणि नियंत्रण कक्षाकडे 257 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये महिलांच्या विरुद्ध वेगवेगळ्या गुन्ह्यांचा समावेश आहे. यातील 69 तक्रारी या घरगुती हिंसाचाराच्या आहेत. तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्हणजेच जानेवारी ते 25 मे 2021 या कालावधीत कौटुंबिक वादाच्या 196 तक्रारी ठाणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. पतीकडून आणि सासरच्या मंडळींकडून हुंडाबळी साठी दाखल होणारे गुन्हे वगळता ठाण्यात कौटुंबिक आणि घरगुती वादाचे 78 गुन्हे 2019 या वर्षभरात दाखल करण्यात आले आहेत. तर मागील चार वर्षात कौटुंबिक आणि घरगुती नातेसंबंधात होणाऱ्या वादाचे तब्बल 339 गुन्हे पोलीस दफ्तरी नोंदवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात या प्रकरणांची संख्या अधिक असू शकते. परंतु, अनेक पीडित महिला तक्रारी नोंदवण्यासाठी पुढे येत नसल्याने तक्रारींची संख्या कमी आहे.
महिलांसाठी विशेष कक्ष महत्वपूर्ण