महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात मॉलमध्ये पैशाची मागणी करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक - fake police officer arrested thane

गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट 5 चा अधिकारी असल्याची बतावणी करत मॉल संचालकाकडे पैशाची मागणी करणाऱ्या तोतयाला मॉल व्यवस्थापकाच्या प्रसंगावधानामुळे अटक करण्यात आली आहे.

thane
ठाण्यात मॉलमध्ये पैशाची मागणी करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

By

Published : Feb 4, 2020, 10:17 AM IST

ठाणे -ठाण्यातील बड्या मॉल संचालकाकडून रक्कम उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या तोतया पोलिसाचे बिंग फुटले आहे. कल्पेश पाटील असे या तोतया पोलिसाचे नाव असून त्याने आपण मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेकडून आल्याचे सांगितले होते. कापूरबावडी येथील लेकसिटी मॉलमध्ये स्पार्क मॅनेजमेंटचे व्यवस्थापक दीपक मोहिते यांच्या सतर्कतेमुळे या तोतयाला पकडण्यात यश आले आहे.

ठाण्यात मॉलमध्ये पैशाची मागणी करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

हेही वाचा -दोन पिस्तुलासह ६ जिंवत काडतुसे बाळगणाऱ्याला अटक

वर्तकनगर येथे राहणाऱ्या कल्पेश पाटीलने आपण मुंबई गुन्हे अन्वेषण शाखा युनिट 5 चे अधिकारी असल्याची बतावणी केली. मॉलमध्ये ड्रग्ज, चरस अशा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्तींची गोपनीय माहिती असून त्याबाबत पडताळणी करून अहवाल सादर करायचे असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार दीपक मोहिते यांनी कल्पेशला संपूर्ण मॉल फिरवून दाखवला.

हेही वाचा -'हो हे माझ्या बापाचं राज्य, आम्ही बाप शोधायला गुजरातला जात नाही'

त्यानंतर कल्पेशने अहवाल सादर करायचा असल्याचो सांगून हा अहवाल तयार करण्यासाठी संगणक मागितला. तसेच आपला मुलगा रुग्णालयात असल्याने त्याच्या उपचारासाठी साडेअकरा हजार रुपये देण्याची मागणी केली. त्यावेळी मोहिते यांना त्याचा संशय आला आणि त्यांनी मॉलच्या मालकांना कळवून कापूरबावडी पोलिसांशी संपर्क साधला आणि या तोतयाला पोलिसांच्या हवाली केले.

ABOUT THE AUTHOR

...view details