ठाणे - पत्रकार असल्याने आपल्याला कोणी अडवणार नाही. या अविर्भावात ड्रग्स तस्करी करणाऱ्या एका कथित पत्रकाराला मुंबई - नाशिक महामार्गावरील अर्जुनली टोलनाका परिसरात पडघा पोलिसांनी सापळा रचून अटक केली ( Journalist Drug Smuggling In Thane ) आहे. मुस्तकीम नसीम खान (वय 33 रा. गैबिनगर, भिवंडी ) असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे. तसेच, या कथित पत्रकाराजवळ तीन वेगवेगळ्या वर्तमानपत्रासह न्यूज चॅनलचे ओळखपत्र आढळून ( Fake Id Journalist ) आले आहे.
खबऱ्यामुळे कथित पत्रकराचा पर्दाफाश
पडघा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके यांना भिवंडी तालुक्यातील मुंबई - नाशिक महामार्गावरील ( Mumbai Nashik Highway ) पडघा नजीकच्या अर्जुनली टोलनाका येथे एक संशयित व्यक्ती ड्रग्सची (एम डी पावडर ) विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामाहिती आधारे पडघा टोलनाका परिसरात सापळा रचण्यात आला. तेव्हा मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची अंग झडती पोलिसांनी घेतली. त्यावेळी त्याच्या जवळ 14.600 ग्रॅम वजनाची एम डी पावडर आढळून आली. याची बाजारात किंमत 73 हजार रुपये आहे. शिवाय त्याच्या खिश्यात दैनिक सत्यशोधक राही, जीआरपी आजतक, क्राईम सेव्हन टीव्ही न्यूज प्रा.ली. असे तीन वेगवेगळ्या माध्यमांचा तो पत्रकार असल्याचे ओळखपत्र आढळून आले आहेत .
पाच दिवसांची पोलीस कोठडी