ठाणे : शहर गुन्हे शाखा युनिट 5 ने मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी 8 कोटींच्या बनावट भारतीय नोटा जप्त ( Fake Indian notes worth crores seized in Thane ) केल्या आहेत. या कारवाईत 2 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपी बनावट नोटा बाजारात चलनात आणणार (Accused will circulate fake notes in market ) होते. राम शर्मा वय ५२ आणि राजेंद्र राऊत वय ५५ अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. ते दोघेही पालघरचे राहणारे आहेत. पोलिसांना तपासादरम्यान आरोपीने 2,000 रुपयांच्या बनावट भारतीय नोटा छापल्याचे आढळून आले. आरोपींकडून तब्ब्ल 400 बंडल जप्त करण्यात आले. या अनुषंगाने अधिकचा तपास पोलीस घेत आहेत. यामागे मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
औद्योगिक युनिटमधील संगणकावर छापण्यात आल्या नोटा : गुप्त माहितीच्या आधारे यासंदर्भात पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिसांनी शुक्रवारी घोडबंदर रोड परिसरात एका कारमध्ये 2,000 रुपयांच्या बनावट नोटांचे 400 बंडल सापडले आणि दोघांना अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक विकास घोडके यांनी दिली. हे दोघेही पालघरचे रहिवासी आहेत. त्यांनी आम्हाला पालघरमधील एका गोडाऊनमधून बनावट भारतीय चलनी नोट (एफआयसीएन) ची खेप मिळाल्याचे सांगितले. त्यांना ती देणाऱ्या व्यक्तीला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या नोटा एका औद्योगिक युनिटमधील संगणकावर छापण्यात आल्या होत्या. एका आरोपीच्या मालकीचे हे युनीट आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या नोटा आल्या कुठून, आरोपींचे नेटवर्क कसे पसरले आहे याची माहिती मिळवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर यासंबंधितांचा पुढील तपास सुरू आहे, असे घोडके यांनी सांगितले.