महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यातील ग्लोबल कोविड रुग्णालयात बोगस डॉक्टर; आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश - ठाणे ग्लोबल कोरोना रुग्णलय बातमी

पालिकेच्या ग्लोबल कोरोना रुग्णलयात या याधी मृतदेह बदली झाले होते. आता बोगस डॉक्टर पकडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

fake doctor found at Global Covid Hospital in Thane
ठाण्यातील ग्लोबल कोविड रुग्णालयात बोगस डॉक्टर; आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

By

Published : Oct 19, 2020, 10:30 PM IST

ठाणे-पालिकेच्या ग्लोबल कोरोना रुग्णलयातच बोगस डॉक्टर पकडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा बोगस डॉक्टरावर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आली. या रुग्णालयात या आधी मृतदेह बदली झाले होते. आता त्यात या धक्कादायक प्रकाराने प्रशासन पुन्हा अडचणीत आले आहे.

राष्ट्रवादीचे गटनेता नजीब मुल्ला यांची प्रतिक्रिया
कोविडचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी तसेच गरीब रुग्णांना कोविड रूग्णालय उपलब्ध व्हावे, यासाठी पालिकेने जवळपास अकराशे खाटांचे ग्लोबल कोविड रुग्णालय उभे केले. रुग्णांना त्याचा फायदा ही झाला; परंतु आता याच रुग्णालयात कोविड रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर हे बोगस आहेत, अशी घटना समोर आलीआहे. २ इंटरशिप पूर्ण न केलेले, तर १ डॉक्टर हा विद्यार्थी अशा तीन बोगस डॉक्टरांना पालिका अधिकाऱ्यांनी पकडले आहे. त्यांच्या बद्दल अहवाल तयार करून पालिका आयुक्तांकडे पाठवला आहे.

खरंतर या रुग्णालयात डॉक्टर देण्याचे काम एका ठेकेदाराला देण्यात आले होते. त्यांच्याकडूनच या बोगस डॉक्टरांची भरती करण्यात आली आहे. या बाबत पालिका अधिकाऱ्यां विचारले असता, आम्ही चौकशी करतोय, अशी उडती उत्तरे दिली जात आहेत. हा धक्कादायक प्रकार असून रुग्णाच्या जीवाशी खेळ आहे. यावर कडक करावी झाली पाहिजे, तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेता नजीब मुल्ला यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details