ठाणे:मुंबईतील ग्लॅनमार्क कंपनीने नेत्रींका कन्सल्टन्सी इंडिया या एजन्सीला बनावट औषधे शोधण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार कंपनीचे फील्ड ऑफिसर राकेश सावंत यांनी कल्याण येथील दुकानांमधून ब्लड प्रेशर वर उपयुक्त टेलमा हे औषध खरेदी करून लॅब मध्ये चेकिंग ला पाठवले होते. लॅब चा रिपोर्ट आल्यानंतर सदर व औषध हे बनावट व ट्रेडमार्क मध्ये छेडछाड करून बनवण्यात आल्याचे आढळून आले त्यावरून त्यांनी कल्याण येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात ६ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती.
कंपनीचे अधिकारी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी कल्याण येथील रॉयल मेडिकल दुकानावर तसेच दृष्टी एंटरप्राइजेस आणि हिलकोर हेल्थ केअर या घाऊक विक्रेत्यांकडून टेलमा हे औषधचा १ लाख ४० हजार ९७४ रुपयांचा बनावट साठा जप्त केला. दरम्यान ठाणे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याने ११ जानेवारी रोजी बनावट औषधांचा साठा करून विक्री करणाऱ्या दोन घाऊक विक्रेत्यासह एका मेडिकल चालकाला औषधांच्या साठा विक्रीस मनाई केल्याची नोटीसा बजावून मेडिकल, आणि घाऊक विक्रेत्याच्या गोदामातून प्राप्त औषध तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहे.
टेलमा हे औषध उच्च रक्तदाब हृदय रोगावर परिणामकारक असे उत्तम औषध आहे. मात्र कल्याण पश्चिम येथील लालचौकी परिरात असलेल्या रॉयल मेडिकल नावाच्या चालकाकडून नोव्हेंबर २०२२ मध्ये सॅम्पल घेतल्यानंतर त्याचा अहवाल जानेवारी २०२३ महिन्यात प्राप्त झाला होता. त्यानुसार हे औषध ट्रेंड मार्क , एमआरपी आणि नाव यामध्ये फेरफार करून बाहेरून उत्पादन केल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आल्याने दोन घाऊक विक्रेते व एक मेडिकल विक्रेता यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.