मीरा भाईंदर - मीरा भाईंदर शहरातील करदात्यांना कर भरण्यासाठी मुदतीत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. महापौर जोस्ना हसनाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. मनपा आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी आदेश जारी केला आहे.
मीरा भाईंदरकरांना कर भरण्यासाठी मुदतवाढ - mira bhayander latest news
मीरा भाईंदर शहरातील करदात्यांना कर भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची वाढीव मुदत देण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनपर्यंत जनजीवन सुरळीत सुरू झालेले नाही. लोकांचे रोजगार बुडालेले आहेत. वर्क फ्रॉम होम आजही सुरू आहे. त्यामुळे लोकांची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने या कर्मचाऱ्यांना मालमत्ता कराचा भरणा करण्याकरीता डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी उपमहापौर हसमुख गहलोत यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी या संदर्भात तत्काळ आदेश जारी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे मीरा भाईंदर शहरातील सर्व करधारकांना दिलासा मिळाला आहे.