ठाणे -एनसीबी अधिकारी समीर वानखेडे ( NCB Officer Sameer Wankhede ) यांच्या अडचणी आता आणखी वाढ होताना दिसत आहे. त्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोटीस बजावली असून त्या नोटीशीला सात दिवसांत उत्तर द्यायचे आहे. 1997 साली वानखेडे यांना देण्यात आलेला मद्य विक्रीचा हॉटेल परवाना ज्या कागदपत्रांच्या आधार दिला, त्यात त्यांच्या वयाचा पुरावा नाही. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोटीस बजावली आहे.
नवी मुंबईतील वाशी पाम बीच रोड परिसरात सद्गुरू बार आणि रेस्टॉरंटचे मालक असल्याचा खुलासा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे ( NCB Officer Sameer Wankhede ) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) यांनी साधला होता. त्यानंतर त्या बारचा परवाना आपल्या नावे असल्याचा खुलासा समीर वानखेडे यांनी केला होता. आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवाना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस वानखेडे यांना बजावली आहे.
बारचे कायदेशीर हक्क ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे
उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या या नोटिसीवर वानखेडे यांना त्यांचे म्हणणे मांडावे लागणार आहे. समीर यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात कामाला होते. या बारचे कायदेशीर हक्क समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. शिवाय कायदेशीर परवाना असल्याने यात बेकायदेशीर काहीच नाही, असेही समीर वानखेडे यांचे म्हणणे आहे. समीर वानखेडे हे भारतीय महसूल सेवेमध्ये ( Indian Revenue Service ) 2006 सालापासून रुजू झाले. तेव्हापासूनच हा परवाना समीर वानखेडे यांच्या नावे आहे. तसेच बार आणि रेस्टॉरंटचा उल्लेख समीर यांच्या वार्षिक स्थावर मालमत्तेमध्येही आहे..