ठाणे :अमृता फडणवीस ब्लॅक मेल प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनाही माझ्याप्रमाणे अनिल जयसिंघानी हा ब्लॅकमेल करणार असल्याची तक्रार एका व्यापाऱ्याने उल्हासनगर पोलीस ठाण्यात केली होती. मात्र, पोलिसांनी या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. विशेष म्हणजे त्या व्यापाऱ्याने 4 मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. मात्र, 16 मार्चला मुबंई पोलिसांनी अमृता फडणवीस यांच्या तक्रारीवरून अनिक्षा जयसिंघानीला ब्लॅकमेल प्रकरणी उल्हासनगरमधून अटक केल्यानंतर स्थानिक पोलीस खळबळून जागे होत. व्यापाऱ्याचा जबाब नोंदवित त्या प्रकरणाचा तपास सुरू केला. सुनील ललवानी असे तक्रारदार व्यापाऱ्याचे नाव आहे.
व्यापाऱ्याने आधीच दिली होती तक्रार : तक्रारदार सुनील लालवानी हे उल्हासनगर मधील चोपडा कोर्ट रोडवरील एका इमारतीमध्ये कुटूंबासह राहतात. त्यांचा साडी विक्रीचा व्यवसाय असून त्यांनी ४ मार्च रोजी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या तक्रार अर्जात नमूद केले कि, मला व माझ्या मुलाला ड्रग्स प्रकरणात बुकी अनिल जयसिंघानी अडकवणार आहे. शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृत यांनाही ब्लँकमेल करणार असल्याचे तक्रार अर्जात नमूद केले असून यापूर्वीही किशोर केसवानी, दीपू केसवानी, नंद जेठानी यांच्यासह १० व्यापाऱ्यांना ब्लँकमेल करत त्यांच्या नावे विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
तक्रारीत काय नमूद केले? : विशेष म्हणजे तक्रारदार सुनील ललवानी यांनी तक्रार अर्जात नमूद केले की, २६ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास माझ्या मुलाच्या मोबाईलवर 8010665890 या मोबाईल नंबरवरून वारंवार संपर्क करीत होता. संर्पक करणारा व्यक्ती हा धुळ्यातून बोलत असल्याचे सांगत होता. त्या व्यक्तीने मोबाईलवर संभाषण करताना सांगितले कि, माझी अनिल जयसिंघानी याने ३० लाखाची फसवणूक केली असून आता सुनील ललवानी आणि मुलाला ड्रग्स प्रकरणात अडकवणार आहे. शिवाय अनिल जयसिंघानी हा देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृत यांनाही ब्लँकमेल करणार असल्याचे त्या व्यक्तीने मोबाईल संभाषणात सांगितल्याचे तक्रार अर्जात नमूद केले आहे.