महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 22, 2019, 11:37 PM IST

ETV Bharat / state

थकीत वेतनासाठी कर्मचाऱ्यांचा उद्यान विभागाच्या दालनात कुटुंबासह ठिय्या

सोमवार(१४ नोव्हेंबर) पर्यंत वेतन देण्यात येईल, असे आश्वासन या कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र, अद्यापही वेतन न मिळाल्याने त्रस्त होऊन नेरुळ, बेलापूर, सानपाडा आणि ऐरोली येथील उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अखेर कार्यालयात बस्तान मांडले.

थकीत वेतनासाठी कर्मचाऱ्यांचा उद्यान विभागाच्या दालनात कुटुंबासह ठिय्या

नवी मुंबई - महापालिकेत कार्यरत असलेल्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी आज(२२ नोव्हेंबर) उद्यान विभागाच्या दालनात कुटुंबासह ठिय्या दिला. ठेकेदारांवर कारवाई करण्यास अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. यावेळी, समाज समता कामगार संघटनेचे अध्यक्ष मंगेश लाड यांनी वेतन मिळेपर्यंत ठिय्या देणार असल्याचा इशाराही दिला.

थकीत वेतनासाठी कर्मचाऱ्यांचा उद्यान विभागाच्या दालनात कुटुंबासह ठिय्या

हेही वाचा -विक्रोळी रेल्वे स्थानकाबाहेर भाजप सरकार विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

सोमवार (१४ नोव्हेंबर) पर्यंत वेतन देण्यात येईल, असे आश्वासन या कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र, अद्यापही वेतन न मिळाल्याने त्रस्त होऊन नेरुळ, बेलापूर, सानपाडा आणि ऐरोली येथील उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अखेर कार्यालयात बस्तान मांडले. जोपर्यंत थकीत वेतन मिळत नाही तोपर्यंत कुटुंबासह ठिय्या देणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details