महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Elgar Parishad Case : गौतम नवलखांच्या जोडीदाराने एनआयएला परत केल्या दारूच्या बाटल्या ; सिगारेटचा उल्लेख नाही - एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा (Elgar Parishad Case accused Gautam Navalkha) यांना प्रकृतीच्या कारणामुळे तळोजा कारागृहातून बी. टी. रणदिवे स्मारक ग्रंथालयात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तेथे त्यांच्या जोडीदाराने व्हिस्कीच्या दोन बाटल्या घेऊऩ जात असल्याचे एनआयएला कळवले. यावर आक्षेप घेतल्यावर हुसैन यांनी दारू एनआयएकडे (Navalkha partner returns liquor bottles to NIA) सोपवली.

Elgar Parishad Case
एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा

By

Published : Dec 5, 2022, 1:58 PM IST

नवी मुंबई : गौतम नवलखा (Elgar Parishad Case accused Gautam Navalkha) यांची जोडीदार सहबा हुसैन यांनी एनआयए या तपास यंत्रणेला दारूच्या बाटल्या परत केल्या आहेत. एल्गार परिषद-माओवादी प्रकरणातील आरोपी नवलखा यांच्या जोडीदारावर एनआयएने आक्षेप घेतला होता. प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयाने नवलखा यांची तळोजा कारागृहातून सुटका करत नवी मुंबई बेलापूर येथील आग्रोळी गावातल्या कॉ. बी. टी. रणदिवे स्मारक ग्रंथालयात त्यांना नजरकैदेत ठेवले. नवलखा यांच्या जोडीदाराला काही अटींसह त्यांच्याबरोबर राहण्याची परवानगी देण्यात आली होती. यादरम्यान हुसैनने तिथे दारूची बाटली आणली. त्यावर एनआयएने आक्षेप घेतला. मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत हुसैन यांनीही आपली बाजू मांडली आहे.

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा

स्थानांतरित करण्याचे आदेश :एनआयएचा आक्षेप फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गौतम नवलखा (Gautam Navalkha) यांना कारागृहातून ग्रंथालयात नजरकैदेत ठेवले. 18 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने 70 वर्षीय नवलखा यांना तळोजा कारागृहातून मुंबईतील सीपीआयच्या मालकीच्या कंपाऊंडमध्ये स्थानांतरित करण्याचे आदेश दिले. नवलखांची जोडीदार हुसैन यांनी १९ नोव्हेंबर रोजी एनआयएला पत्र लिहीत, मी माझ्या स्वतःच्या वापरासाठी व्हिस्कीच्या दोन बाटल्या (ग्लेनमोरंगी आणि रूलेट) नजरकैद परिसरात घेऊन जात असल्याचे कळवले. तसेच आपल्याकडे वैयक्तिक वापरासाठी सिगारेटची नऊ पाकिटे (क्लासिक अल्ट्रा माईल्ड) असल्याचा उल्लेखही त्यांनी या पत्रात केला होता. नवलखा हे दारू, सिगारेट पित नसल्याचेही त्यांनी या पत्रात नमूद केले होते. एनआयएने दारु आणि सिगारेट खोलीत नेल्याबद्दल आक्षेप (Navalkha partner returns liquor bottles to NIA) घेतला.

एनआयएचा आक्षेप :अगोदरच हुसैनच्या गोपनीयतेचे उल्लंघन होईल या कारणावरुन सुप्रीम कोर्टाने सीसीटीव्ही कव्हरेजला परवानगी नाकारली होती. नशेमुळे अनपेक्षित परिस्थिती उद्भवू शकते. त्याला परवानगीदेखील नव्हती. त्यामुळे दारू आणि सिगारेटवर एनआयएने आक्षेप घेतला होता. त्यानंतर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलने नजरकैदीतील खोलीत जाऊन दारूच्या बाटल्या जमा करण्यास सांगितले. त्यानंतर 21 नोव्हेंबरला हुसैन यांनी दारू एनआयएकडे सोपवली. मात्र सिगारेटही परत केली की नाही, याबाबत त्यांनी काहीही सांगितले (Elgar Parishad Case) नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details