नवी मुंबई -तळोजा कारागृहात सुविधांचा वानवा असल्याने एल्गार परिषदेतील आरोपी सागर गोरखे याने जेलमध्ये उपोषण सुरू केले होते. हे उपोषण गेल्या 7 दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे आमदार कपिल पाटील ( MLA Kapil Patil ) यांनी सागर गोरखेची आज (शुक्रवारी) तळोजा जेलमध्ये ( Sagar Gorkhe Taloja Jail Agitation ) जात भेट घेतली. आमदारांनी समजूत काढत सागरने उपोषण सोडल्याची माहिती आमदार कपिल पाटील यांनी दिली आहे.
कैद्यांना चांगली सुविधा मिळावी म्हणून उपोषण :तळोजा जेलमध्ये पाण्याची सोय नाही, अन्न चांगले नाही. तसेच इतर पायाभूत सुविधा पुरविल्या जात नाहीत, प्रतीक्षागृह नाही. शिवाय जेल प्रशासनाकडून वागणूक चांगली मिळत नाही. या कारणावरून कैदी सागर याने उपोषण केले होते. कायदेशीर लढाई आपण लढत राहू मात्र, उपोषण करून शरीराचे असे हाल करणे चांगले नाही, असे मत आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले. कपिल पाटील यांनी कैदी सागर गोरखेची समजूत काढताच सागरने उपोषण सोडल्याची माहिती कपिल पाटील यांनी दिली आहे.