ठाणे - शहापूर शहरातील ६७ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील आणखी ७ जणांच्या कोरोना संसर्ग चाचणीचे रिपोर्ट बुधवारी दुपारी निगेटिव्ह आले आहेत. यापूर्वी सोमवारी होम क्वॉरंटाईन केलेल्या ४ जणांच्या कोरोना संसर्ग चाचणीचे रिपोर्टदेखील निगेटिव्ह आले होते. त्यामुळे शहापूर शहरातील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील हायरिस्क क्वारंटाईन केलेल्या संपूर्ण ११ जणांचे चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने शहापूरकरांसाठी दिलासादायक बातमी ठरली आहे.
शहापूरकरांना दिलासा; कोरोनाबाधिताच्या संपर्कातील ११ जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह - ठा
कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ११ पैकी ४ जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले होते, तर ७ जणांना कल्याण-भिवंडी बायपास येथे हायरिस्क क्वारंटाईन करण्यात आले होते. ११ जणांपैकी ४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे सोमवारी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते.
कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ११ पैकी ४ जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले होते, तर ७ जणांना कल्याण-भिवंडी बायपास येथे हायरिस्क क्वारंटाईन करण्यात आले होते. ११ जणांपैकी ४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे सोमवारी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते, तर उर्वरित ७ जणांचे अहवाल प्राप्तीच्या प्रतीक्षेत होते ते बुधवारी प्राप्त झाले असून निगेटिव्ह असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सद्यस्थितीत ११ जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच ठाणे येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित ६७ वर्षीय रुग्णाच्या प्रकृतीतही सुधारणा होत असल्याची माहिती तहसीलदार नीलिमा सुर्यवंशी यांनी दिली आहे.