प्रतिक्रिया देताना शिशिर पडवळ सर्विस इन्चार्ज, संदीप राईझदा जनरल मॅनेजर ओलेक्ट्रा बस ठाणे : ठाण्यात गुरूवारी प्रदूषण मुक्त असलेल्या 12 बसेस कार्यरत झाल्या आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत एकूण 123 बस सेवेत दाखल होणार आहेत. लवकरच सीएनजीच्या 20 बस दोन टप्प्यात दाखल होणार आहे, अशी माहिती परिवहन सदस्यांनी दिली आहे. त्यामुळे आता परिवहनच्या सेवेत चांगला बदल पाहायला मिळणार आहे. ठाणे शहराची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या (टीएमटी) परिवहन सेवेत गुरुवारपासून 'ब्रीथ ईझी, झिरो इंमिशन, नो नॉईज' अशा पर्यावरणपूरक १२३ ई- बस मिळाल्या आहेत.
१२३ ई बसेस खरेदी करण्याचा कार्यादेश : ठाणे महापालिकेचा परिवहन उपक्रम (टीएमटी) अक्षरशः गाळात रुतला आहे. महापालिकेच्या अनुदानावरच परिवहनचा डोलारा उभा आहे. तरीही ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक योजना महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून इलेक्ट्रीकल बसेस उपलब्ध करण्याची कार्यवाही झाली आहे, यात अत्याधुनिक ई बस परिवहन सेवेच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहेत. महापालिकेस प्राप्त झालेल्या अनुदानातंर्गत १२३ ई बस खरेदी करण्याचा कार्यादेश देण्यात आला आहे. या महिन्यात ३२ ई बस प्राप्त होणार आहे. जून महिन्यापर्यत उर्वरित ९१ ई-बस प्रत्यक्ष सेवेत दाखल होणार आहेत.
सर्वात फास्ट चार्जिग स्टेशन महत्त्वाचे : ईलेक्ट्रीक वाहनांसाठी आता तीन ठिकाणी फास्ट चार्जिंग स्टेशन देखील सुरू करण्यात आले आहेत. ईलेक्ट्रीक वाहनांसाठी सर्वात वेळ खावू प्रकार चार्जिंगचा असतो. या बस दीड तासात पूर्ण चार्ज होणार आहे. सर्वाधिक ताकतीचे 180 किलो वेटचे तीन स्टेशन उभारण्यात आले आहेत. जिथे अहोरात्र चार्जिंग करता येणार आहे. टीएमटीकडून इलेक्ट्रिक बससाठी निकषांची निश्चिती केली आहे. १२ मिटर लांबीची बस एका चार्जिंगमध्ये २०० किमी प्रवास करते, तर ९ मिटर लांबीच्या बसेसने एका चार्जिंगमध्ये १८० किमी लांबीचा प्रवास अपेक्षीत आहे.
काय आहेत बसमध्ये सुविधा :सर्वाधिक ताकत असलेला एसी प्रत्येक सीटजवळ मोबाईल चार्जिंग पोर्ट सुपर सस्पेंशन, सीसीटिव्ही कॅमेरे, हवा आणि ध्वनी प्रदूषण मुक्त प्रवास, आणि मोठ्या प्रमाणात मोकळी जागा अशा अनेक सुविधा या बसमध्ये उपलब्ध आहेत. शिवाय डिजिटल डिस्प्ले रूट माहिती अशा अनेक अत्याधुनिक सुविधा या बसमध्ये उपलब्ध आहेत. नव्याने उपलब्ध होणाऱ्या बस महापालिका क्षेत्रात सर्वात कमी उत्पन्न असणाऱ्या डिझेल बसच्या मार्गिकेवर चालविण्यात येणार आहेत.
हेही वाचा : Nana Patole VS Balasaheb Thorat : पटोले - थोरात मतभेदावर रविवारी खलबत; प्रभारी एच के पाटील मुंबई दौऱ्यावर