महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याण लोकसभा मतदानासाठी कर्मचाऱ्यांसह निवडणूक यंत्रणा सज्ज - यंत्रणा सज्ज

कल्याण लोकसभेच्या निवडणुकीसाठी २ हजार ६३ मतदान केंद्रावर ११ हजार ३७० कर्मचाऱ्यांसह निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. या ठिकाणी २९ एप्रिलला मतदाना होणार आहे.

कल्याण लोकसभा मतदानासाठी कर्मचाऱ्यांसह निवडणूक यंत्रणा सज्ज

By

Published : Apr 28, 2019, 7:41 PM IST

ठाणे- कल्याण लोकसभेच्या निवडणुकीसाठी २ हजार ६३ मतदान केंद्रावर ११ हजार ३७० कर्मचाऱ्यांसह निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. या ठिकाणी २९ एप्रिलला मतदाना होणार आहे. येथे सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होऊन संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान चालणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात १९ लाख ६५ हजार ६३७ मतदार २ हजार ६३ मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 4 लाखांहून अधिक मतदार आहेत. त्यानंतर डोंबिवलीत ३ लाख ४१ हजार, कल्याण पूर्वमध्ये ३ लाख ४० हजार, मुंब्रा-कळवात ३ लाख ३७ हजार, अंबरनाथ ३ लाख ८ हजार आणि उल्हासनगरमध्ये २ लाख २६ हजार मतदार आहेत.

कल्याण लोकसभा मतदानासाठी कर्मचाऱ्यांसह निवडणूक यंत्रणा सज्ज

मतदाराच्या सोयीसाठी रॅम्प, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, मदत कक्ष, दिशादर्शक, शौचालय यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. ज्या मतदान केंद्रावर मतदारांना रांगा लावण्यासाठी व्हरांड्याची सोय नाही. अशा १९० मतदान केंद्रावर शेड उभारण्यात आले आहेत. तर सुमारे ३९५ मतदान केंद्रावर पाळणाघराची सुविधा करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारासाठी रिक्षा सुविधा देण्यात आली आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघासाठी ११,३७० कर्मचाऱयांची नेमणुक करण्यात आली आहे.एकूण २ हजार ३९० कंट्रोल युनिट, ४ हजार ८७२ बॅलेट युनिट आणि २ हजार ५९४ व्हीव्हीपॅट युनिट देण्यात आले आहेत. प्रत्येक कर्मचाऱयांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिनसह मतदान केंद्रापर्यत पोहोचविण्यासाठी आणि मतदान संपल्या नंतर पुन्हा स्ट्राँगरूम मध्ये जाण्यासाठी मिनीबस, बस, टेम्पो, ट्रक, जीप, कार अशा एकूण ९५० वाहनांची सोय करण्यात आली आहे.

मतदान केंद्र बंद पडल्यास तातडीने मतदान यंत्र बदलण्यासाठी २४६ झोनल ऑफिसर नेमण्यात आले आहेत. कल्याणमधील मलंगगड येथील मतदार केंद्र लांब असल्यामुळे या केंद्रावर ज्यादा मतदान यंत्र ठेवले जाणार आहेत. तर स्ट्राँगरूममध्ये फायर फायटिंग, सीसीटीव्ही कॅमेरा तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details