Elder woman Molested : ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा वॉर्डबॉयकडून विनयभंग, आरोपी जेरबंद - Thane Update
१६ ते १९ फेब्रुवारीच्या दरम्यान एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा विनयभंग (Molestation of a Elder woman) केल्याची घटना डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात समोर आली आहे. पीडित महिला उपचार घेत असताना वॉर्डबॉयने तिचा विनयभंग (Elder woman molested by wardboy) केल्याचा गुन्हा नुकताच दाखल झाला असून त्या वॉर्डबॉयला पोलिसांनी अटक (Wardboy arrested by police) केली आहे. कानदास वैष्णव असे त्या आरोपीचे नाव आहे.
ठाणे:डोंबिवली पूर्व भागातील एका नामांकित खाजगी रुग्णालयात १६ ते १९ फेब्रुवारीच्या दरम्यान पीडित महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या दरम्यान वृद्ध महिला एक्स-रे करण्यासाठी रूम मध्ये गेली असता वॉर्डबॉय ने त्या पीडित महिलेशी अश्लील वर्तन केले. (Elderly woman molested by wardboy) मात्र हा प्रकार चुकून घडला असावा असे तीला वाटले, मात्र या आरोपी वॉर्डबॉयने दुसऱ्यांदा तसाच प्रकार केल्याचे पीडितेने ही बाब आपल्या मुलीला सांगितली. उपचारानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार केशव हसगुळे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू करून आरोपी कानदास वैष्णव याला अटक (Wardboy arrested by police) केली आहे.