महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक.! पब्जी खेळण्यास विरोध करणाऱ्या मोठ्या भावाची अल्पवयीन मुलाने केली निर्घृण हत्या

आज दुपारच्या सुमारास, मोहम्मद फहाद याने आपल्या आईचा मोबाईल घेऊन त्यावर ऑनलाइन पबजी गेम खेळत होता. त्यावेळी त्याचा मोठा भाऊ मोहम्मद हुसेन याने त्यास मोबाईल वर गेम खेळण्यास मनाई केली.

शांती नगर पोलिस ठाणे

By

Published : Jun 29, 2019, 7:29 PM IST

ठाणे- भिवंडीत १५ वर्षाच्या लहान भावाने १९ वर्षीय मोठ्या भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घडली आहे. आईच्या मोबाईलवर पब्जी गेम खेळण्यासाठी मनाई केल्याने या लहान भावाने आपल्या सख्ख्या मोठ्या भावाच्या पोटात कात्रीने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना भिवंडीतील चौहान कॉलनीमध्ये घडली आहे. या हत्येप्रकरणी, शांतीनगर पोलीस ठाण्यात लहान भावावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शांती नगर पोलिस ठाणे, भिवंडी

मोहम्मद हुसेन मोहम्मद अच्छे शाह (वय १९) असे हत्या झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. तर मोहम्मद फहाद वय (१५) असे हत्येप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लहान भावाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शांती नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चौहान कॉलनीतील येथील एका चाळीत अच्छे शाह कुटुंब राहते. आज दुपारच्या सुमारास, मोहम्मद फहाद याने आपल्या आईचा मोबाईल घेऊन त्यावर ऑनलाइन पब्जी गेम खेळत होता. त्यावेळी त्याचा मोठा भाऊ मोहम्मद हुसेन याने त्यास मोबाईल वर गेम खेळण्यास मनाई केली. आणि त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. या गोष्टीचा राग येऊन लहान भाऊ मोहम्मद फहाद याने भांडण केले.

या भांडणाचा वाद एवढा विकोपाला गेला की, लहान भाऊ मोहम्मद फहाद याने घरातील कात्रीने मोठा भाऊ मोहम्मद हुसेनच्या छातीवर पोटावर सपासप वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. मोहम्मद हुसेन रक्ताच्या थारोळ्यात घरात पडल्याचे पाहून नातेवाईकांनी त्याला जखमी अवस्थेत भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार करण्यापूर्वी येथील डॉक्टर यांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसूजा या पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी हत्या करणाऱ्या अल्पवयीन भावाला ताब्यात घेत पंचनामा केला. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details