महाराष्ट्र

maharashtra

भिवंडी इमारत दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; पालकमंत्र्यांची घोषणा

By

Published : Sep 21, 2020, 10:59 AM IST

Updated : Sep 21, 2020, 1:06 PM IST

भिवंडीमध्ये आज पहाटे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला. पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी या घटनेत बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Eknath shinde on bhiwandi accident
ठाणे इमारत दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; पालकमंत्र्यांची घोषणा

ठाणे : भिवंडीमध्ये आज पहाटे एक तीनमजली इमारत कोसळली. यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला.

भिवंडी इमारत दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; पालकमंत्र्यांची घोषणा

यावेळी बोलताना शिंदेंनी आपत्तीग्रस्तांना सर्व प्रकारची मदत तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावी अशी सूचना महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिल्या. यासोबतच, दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत केली जाईल असे त्यांनी जाहीर केले.

आज पहाटे तीनच्या सुमारास भिवंडीच्या धामणकर नाका, पटेल कंपाउंड परिसरात असलेली एक ३ मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफ आणि टीडीआरएफची टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे.

हेही वाचा :'ती' इमारत धोकादायक होती, पालिकेच्या नोटीसीकडे रहिवाशांचे दुर्लक्ष

Last Updated : Sep 21, 2020, 1:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details