ठाणे- येत्या १० दिवसांमध्ये ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवले नाहीतर संबंधित अधिकाऱयांवर कारवाई केली जाईल. तसेच टोल रोडवरील टोल बंद केले जातील, असा धमकीवजा इशारा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिला आहे.
दहा दिवसांत रस्त्यांवरील खड्डे न भरल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई ठाणे जिल्हाधिकारी नियोजन भवनात तीन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, एम. एम. आर. डी. ए., एमएसआरडीसी, वाहतूक पोलीस विभाग, परिवहन विभाग, सिडको या सर्वांची तातडीची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
कोट्यवधी रुपये पाण्यात..! नुतनीकरण केलेला मुंब्रा बायपास उखडल्याने प्रवाशांमध्ये रोष
दोन्ही जिल्ह्यांमध्ये रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे फक्त नागरिकांनाच त्रास होतो असे नाही. अनेक मंत्री आणि राजकीय पक्षांच्या प्रमुखांना देखील या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जाहीरपणे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, असे ते यावेळी म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहित काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या खड्डेयुक्त रस्त्यांचा फटका मतदानात बसू शकतो हे त्यांच्या लक्षात आल्याने दोन्ही पालकमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली.
खड्डा बुजवण्यासाठी विधीवत पूजा करत काँग्रेसचे आंदोलन
विरोधक आमच्या फोटोचे बॅनर लावत आहेत. आता मात्र हे सहन केले जाणार नाही. निधी आणून द्यायचे काम केले आहे. आता पुढील कामे तुम्ही करायला पाहिजे होती. मात्र, तुम्ही ती कारवाई केली नाही. त्यामुळे पुढील १० दिवसात रस्त्यांवरील खड्डे बुजवा नाहीतर कारवाईला सामारे जा, असा इशारा या मंत्र्यांनी दिला. तसेच २८ फेब्रुवारी २०२० या दिवशी कल्याण पत्री पुलाचे काम पूर्ण होणार आहे. त्याच दिवशी पत्री पूल वाहतुकीकरता खुला केला जाणार असल्याची माहिती देखील संबंधीत अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.
डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा १२ मीटरचा उड्डाण पूल बंद करण्यात आला आहे. तो पूल आता २५ मीटर केला जाणार असून यासाठी लागणारा ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला आहे. आता लवकरच कोपर पुलाच्या कामाला सुरुवात होईल, असे रविंद्र चव्हाण यावेळी म्हणाले. यावेळी ठाणे पोलीस, ठाणे ग्रामीण पोलीस, महापालिका अधिकारी, महसूल अधिकारी, टोल कंपन्यांचे अधिकारी आदी उपस्थित होते.