ठाणे -भाजपला अखेरचा जय श्रीराम करत कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे हे मुंबई येथून मुक्ताईनगर येथील आपल्या मतदारसंघात परत जात होते. यावेळी मुंबई - नाशिक महामार्गावरील रांजणोली बायपासवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्य स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीतील एंट्रीने वाहतूक पोलिसांने त्यांचे स्वागत करत पुष्पगुछ दिला.
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीतील एंट्रीचे वाहतूक पोलिसांनेही केले स्वागत
कल्याण जिल्हा राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सुधीर भाऊ वंडार पाटील यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतषबाजी करत एकनाथ खडसे त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे स्वागत करण्यात आले. या ठिकाणी कल्याण उल्हासनगर येथूनही पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. तर मानकोली नाका या ठिकाणी जय आगरी सेवा संस्था, शेतकरी संघटना पदाधिकारी यांनी ही एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे स्वागत केले.
मुंबई - नाशिक मार्गावरील राजनोली बायपास या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष भगवान टावरे आणि कल्याण जिल्हा राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सुधीर भाऊ वंडार पाटील यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतषबाजी करत एकनाथ खडसे त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे स्वागत करण्यात आले. या ठिकाणी कल्याण उल्हासनगर येथूनही पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. तर मानकोली नाका या ठिकाणी जय आगरी सेवा संस्था, शेतकरी संघटना पदाधिकारी यांनी ही एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे स्वागत केले.