महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आदित्य ठाकरे यांच्या रुपाने राजकारणात एक नवीन पर्व' - शिवसेना

आदित्य ठाकरे यांनी वरळीतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा स्वत: केली आहे. वरळीतील शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी ही घोषणा केली. यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

एकनाथ शिंदे

By

Published : Oct 1, 2019, 6:43 PM IST

Updated : Oct 1, 2019, 7:14 PM IST

ठाणे - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. यावर शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्हणाले, आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयाने एक नवीन पर्व राजकारणात येत आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे. तसेच युती झाल्याने आता समोर आव्हान नाहीत. आता एकत्र मिळून काम करायचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले. ठाण्यात सोमवारी रात्री उशीरा झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते.

एकनाथ शिंदे

हेही वाचा - विधानसभा निवडणूक 2019 : खा.चिखलीकरांना दे धक्का... होमपीचवरची उमेदवारी शिवसेनेच्या वाट्याला..!

शिंदे म्हणाले, युतीमुळे अनेक ठिकाणी नाराजी होती. मात्रस उद्धव ठाकरे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्रित काम करण्याचा जो आदेश दिला आहे, त्यामुळे कार्यकर्ते एकत्र येऊन काम करतील यात काही शंका नाही. युतीची सत्ता पुन्हा येणार निर्विवाद आहे. युतीच्या काळात अनेक मोठ्या कामांचा विशेष करुन एमएमआर रिजन मध्ये मोठ्या कामांना सुरुवात झाली आहे. ती कामे पुढील ५ वर्षात पुर्ण करू आणि नागरिकांना दिलासा देऊ, असा विश्वास ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ठाण्यात रात्री उशीरा शिवसैनिकांच्या बैठकी दरम्यान ते बोलत होते.

हेही वाचा - अर्जुन खोतकरांनी भरला शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज

Last Updated : Oct 1, 2019, 7:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details