महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'एक हात पोलीस दादाचा', वृद्ध नागरिकांसाठी विठ्ठलवाडी पोलिसांचा अनोखा उपक्रम

अपत्य नसल्याने किंवा मुलांनी व नातेवाईकांनी वाऱ्यावर सोडल्याने अनेक वृद्धांना एकाकी जीवन जगावे लागते. आजारपणात मायेचा हात फिरवण्यासाठी किंवा साधी विचारपूस करण्यासाठीही त्यांच्याजवळ कुणीच नसते. अशा एकाकी वृद्धांना मायेचा ओलावा देण्यासाठी उल्हासनगरमध्ये विठ्ठलवाडी पोलिसांनी 'एक हात पोलीस दादाचा' उपक्रम सुरू केला.

वृद्ध नागरिकांची विचारपूस करताना पोलीस अधिकारी

By

Published : Oct 30, 2019, 5:15 PM IST

ठाणे -विठ्ठलवाडी पोलिसांनी दिवाळीनिमित्त वयोवृद्ध नागरिकांना अनोखी दिवाळी भेट देत माणुसकीचे दर्शन घडवले आहे. 'एक हात पोलीस दादाचा' हा उपक्रम राबवण्यात आला आहे. वृद्धांसाठी आजारपणात मोफत जेवण, उपचार आणि सुरक्षा मिळावी यासाठी पोलिसांनी हा अनोखा उपक्रम राबवला आहे.

वृद्ध नागरिकांसाठी विठ्ठलवाडी पोलिसांचा अनोखा उपक्रम

अपत्य नसल्याने किंवा मुलांनी व नातेवाईकांनी वाऱ्यावर सोडल्याने अनेक वृद्धांना एकाकी जीवन जगावे लागते. आजारपणात मायेचा हात फिरवण्यासाठी किवा साधी विचारपूस करण्यासाठीही त्यांच्याजवळ कुणीच नसते. अशा एकाकी वृद्धांना मायेचा ओलावा देण्यासाठी उल्हासनगरमध्ये विठ्ठलवाडी पोलिसांनी 'एक हात पोलीस दादाचा' उपक्रम सुरू केला आहे.

हेही वाचा - 'आठवड्यातील वार सत्तेसाठी वाटून घ्या आणि उरलेला रविवार आठवलेंना द्या', आव्हाडांची टीका


वृद्ध नागरिकांना पोलीस कार्ड देऊन २४ तास हेल्पलाईनही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विठ्ठलवाडी पोलिसांनी उल्हासनगरमधील व्यापारी, समाजसेवक, डॉक्टर आणि पोलीस यांची एकत्र कमिटी स्थापन केली. वृद्ध नागरिकांच्या आजारपण, उपचार आणि सुरक्षेची जबाबदारी या कमिटीने घेतली आहे.
पोलिसांनी एकाकी राहणाऱ्या प्रत्येक वयोवृद्धांच्या घरी जाऊन दिवाळी भेट दिली. विठ्ठलवाडी पोलिसांनी राबवलेल्या 'एक हात पोलीस दादाचा' या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details