महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ईडी' विरोधात भिवंडीत विनापरवाना आंदोलन करणाऱ्या ८ जणांना अटक - पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया

भारतात विविध ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे बँक अकाउंट केंद्रीय तपास यंत्रणा प्रवर्तन निदेशालय (इ.डी) कडून जप्त करण्यात आले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ भिवंडीतील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या वतीने भिवंडीत पोलिसांच्या विना परवानगीने आंदोलन केले होते. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आंदोलन करणाऱ्या 8 जणांना अटक केली आहे.

न

By

Published : Jun 4, 2022, 5:49 PM IST

ठाणे -भारतात विविध ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे बँक अकाउंट केंद्रीय तपास यंत्रणा प्रवर्तन निदेशालय (इ.डी) कडून जप्त करण्यात आले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ भिवंडीतील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या वतीने भिवंडीत पोलिसांच्या विना परवानगीने आंदोलन केले होते. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आंदोलन करणाऱ्या 8 जणांना अटक केली आहे.

या आंदोलनकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी न घेता शुक्रवारी भिवंडी शहर महानगरपालिकेच्या गेटसमोर आंदोलन घडवून आणले. विशेष म्हणजे आंदोलनापूर्वीच आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी फौ.प्र.सं.कलम 149, 68 अन्वये नोटीस बजावली होती. मात्र, आंदोलनकर्त्यांनी नोटीसेचा भंग करून आंदोलन सुरू ठेवल्याने निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विजय निंबा गवळी यांनी भिवंडी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या अध्यक्षांसह आंदोलनकर्त्या ८ जणांवर भादवि कलम १८८ प्रमाणे निजामपूर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करून शुक्रवारी (दि. 3 जून) सायंकाळच्या सुमारास अटक केली आहे.

संघटनेचे अध्यक्ष आशिक जमील शेख, शोएब मो.अली अन्सारी, वसीम अख्तर अन्सारी, मो.उमर मो.रमजान अन्सारी, परवेज शब्बीर खान, मंजूर अहमद खान, मो.खुर्शीद लाल मो.अन्सारी, अहमद मुख्तार अहमद शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या सर्वांना सी.आर.पी.सी 41 (अ ) प्रमाणे नोटीस अदा करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए.डी. पवार करत आहेत.

हेही वाचा -Thane Crime : मालकाच्या पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या कामगाराला जन्मठेप

ABOUT THE AUTHOR

...view details