महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुष्पक एक्स्प्रेस घटना : अत्याचार अन् दरोडा प्रकरणी आठ जण अटकेत - पुष्पक एक्स्प्रेस घटना

मुंबईच्या दिशेने येणाऱ्या धावत्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये दरोडा पडल्याची घटना घडली होती. ही घटना इगतपुरी ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान घडली असून आठ दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमध्ये अचानक प्रवेश करून प्रवाशांकडून रोकड, मोबाईल आणि दागिने लुटल्याचा प्रकार घडला. धक्कादायक बाब म्हणजे या दरोडेखोरांनी 20 वर्षीय विवाहितेवर तिच्या पती समोरच सामूहिक अत्याचार केला. ही घटना शुक्रवारी (8 ऑक्टोबर 2021) घडली होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांसह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ दरोडेखोरांना अटक केली आहे.

c
c

By

Published : Oct 10, 2021, 4:42 PM IST

Updated : Oct 10, 2021, 4:50 PM IST

ठाणे - लखनऊहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या धावत्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये दरोडा पडल्याची घटना घडली होती. ही घटना इगतपुरी ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान घडली असून आठ दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमध्ये अचानक प्रवेश करून 10 ते 20 प्रवाशांना धाक दाखवून रोकड, मोबाईल आणि दागिने लुटल्याचा प्रकार घडला. धक्कादायक बाब म्हणजे या दरोडेखोरांनी 20 वर्षीय विवाहितेवर तिच्या पती समोरच सामूहिक अत्याचार केला. ही घटना शुक्रवारी (8 ऑक्टोबर 2021) घडली होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांसह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ दरोडेखोरांना अटक केली आहे.

आठ दरोडेखोर अटकेत

या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी तपास सुरू केला असून आतापर्यंत 8 दरोडेखोरांना दरोडा व सामूहिक अत्याचार प्रकरणी अटक केली आहे. अर्शद खान, प्रकाश पारधी, किशोर सोनावणे, काशिनाथ उर्फ काश्या तेलंग, आकाश शेणारे, धनंजय भगत उर्फ गुड्डू, अशी अटक केलेल्या आरोपांची नावे आहे. तर दोन आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले असून त्यांची नावे कळू शकली नाही.

काय घडली होती घटना..?

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्थानकात पोहोचली. इगतपुरी स्थानकातून रेल्वे मुंबईच्या दिशेने येत असताना इगतपुरी स्थानक सोडल्यानंतर बोगद्याजवळ रेल्वे पोहोचली. त्यावेळी रेल्वेची गती कमी असल्याने रात्री आठच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनतर प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. दरोडेखोरांचा हातात फाइटर आणि बेल्ट होता. धक्कादायक बाब म्हणजे एका 20 वर्षीय प्रवासी महिलेची छेडछाड करून तिच्यावर लैंगिक अत्याचार दरोडेखोरांनी केला. मात्र, या दरम्यान काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले होते.

हेही वाचा- बस - ट्रेनमधील बलात्काराच्या 'या' घटनांनी हादरले होते महाराष्ट्र, वाचा सविस्तर...

Last Updated : Oct 10, 2021, 4:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details