ठाणे :ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या ( Thane Police Commissionerate ) हद्दीत विविध पोलीस ठाण्यात अपहरण सारखे गुन्हे दाखल होण्याची संख्या मोठी ( Kidnapping Crimes in Thane Police Commissionerate ) आहे. पोलिसांना अपहरण झालेल्या मुली सापडत नाहीत. त्यामुळे सदरचे गुन्हे सहा ते सात वर्ष कालावधीनंतर अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध विभागाकडे ( Immoral Human Trafficking Prevention Division ) तपासासाठी दाखल करतात. तर या,च पथकाच्या अखत्यारीत पिटा सारख्या गुन्ह्यांवर धडक कारवाई करण्यात येते.
अपहरणाच्या ८४६ गुन्ह्यापैकीं ७३६ गुन्हे उघड-वर्षभरात ठाणे आयुक्तालयात दाखल झालेल्या अपहरणाच्या ८४६ गुन्ह्यापैकीं ७३६ गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत. यामध्ये २१५ मुलांचा समावेश आहे. तर ६११ मुलांचा समावेश आहे. प्रामुख्याने सदरचे गुन्हे हे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यात दाखल होणारे गुन्हे आहेत. त्या गुन्ह्यांचा तपास न लागल्यानंतर सदरचे गुन्हे हे अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध शाखेकडे पाठविण्यात येतात. त्यानंतर वर्षभराचा काळ लोटल्यानंतर पोलीस पथक तपासाला सुरुवात करते. तर दुसरीकडे घरातून पळून गेलेली मुले, मुली या मात्र आपला मोबाईल नंबर बदलतात. त्यामुळे अनैतिक मानवी वाहतूक विभागाच्या पथकाला शोध घेण्यास मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. दरम्यान उघड गुन्ह्यात अनेक मुली, मुली या विवाहित झाल्यानंतर पथकाने शोधून काढल्या असल्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रिती सत्यजित चव्हाण यांनी दिली.
प्रेम प्रकरण ठरतात घातक -अनैतिक मानवी तस्करी प्रतयिबंध विभागाकडे आलेल्या गुन्ह्याची तपासणी करताना प्रकर्षाने आढळते. ही प्रकरणे अपहरण नसून प्रेमप्रकरणे असलयाचे समोर येते. मुली-मुले पळून जातात, कुठेतरी संसार साधतात. त्यानंतर ते काही काळानंतर आपल्या आई-बाबा यांच्याशी संपर्क करतात त्यानंतर पोलीस पथकाच्या तपासाला पुन्हा एकदा वेग येतो. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचतात तेव्हा दोन्ही पाळलेली मुलगी, मुलगा हे विवाहित आढळतात. वास्तविक अनेक कारणास्तव मुले घरातून बाहेर पडतात. ती सापडली नाही कि, स्थानिक पोलीस ठाण्यात अपहरण सारखे गुन्हे दाखल करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पालकांनी आपल्या पाल्याच्या वागणुकीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याच्याशी मैत्री करून त्याला मित्राप्रमाणे ट्रीटमेंट देणे गरजेचे आहे. त्याच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. मुले एकटी पडलेली असतात त्यामुळे ते मोबाईलमध्ये व्यस्त होतात. मोबाईलमधील व्हाट्सअप,फेसबुक सारख्या गोष्टीमुळे मैत्री वाढते आणि प्रेमप्रकरणे घडतात. तेव्हा पालकांनी मुली-मुले यांच्याकडे जातीने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. दुर्लक्ष झाल्यास अशा पद्धतीने परिणाम समोर येतात. आक्टोबर मध्ये २१ केसेस आल्या होत्या. त्यापैकी १५ केसेस उघड करण्यात आलेल्या आहेत. तर ४ गुन्ह्यांचा समांतर तपास सुरु आहे.