ठाणे- रेल्वे स्थानकाबाहेर आज रिक्षा-टॅक्सी चालक यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व सॅनिटायझर वाटप करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला रिक्षा-टॅक्सी चालकांनी रेल्वे स्थानक परिसरात मोठी गर्दी केली होती. यावेळी मास्क वन सॅनिटायझर वाटपादरम्यान रिक्षा-टॅक्सी चालकांनी धक्काबुक्की केली.
शासनाच्या आदेशाला पालकमंत्र्यांकडूनच केराची टोपली, मास्कवाटप कार्यक्रमात धक्काबुक्की - सॅनिटायझर
सार्वजनिक ठिकणी गर्दी करु नये, असे शासनाने निर्देश दिले आहेत. पण, याच सरकारच्या मंत्र्यांनी या निर्देशाला केराची टोपली दाखवत ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मास्क आणि सॅनिटायझर वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. एवढेच नाही तर यावेळी ठाण्याचे पोलीस आयुक्तांनी देखील उपस्थिती लावली होती. यामुळे सरकारच्याच मंत्र्यांनी सरकारच्या आदेशाची पायमल्ली केल्याची चर्चा ठाणे परिसरात सुरु आहे.
यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस आयुक्त विवेक फनसळकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमस्थळावरून पोलीस आयुक्त आणि पालकमंत्री जाताच चालकांनी धक्काबुक्की केली. यातून या चालकांच्या बेशिस्तीचे दर्शन झाले. एकीकडे शासनाकडून कोणत्याही ठिकाणी गर्दी न करण्याचे आदेश असताना दुसरीकडे सथानक परिसरात अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करुन मोठी गर्दी केली जाते. खुद्द मंत्री महोदय देखील या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवतात यामुळे सरकारचे मंत्रीच शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत असल्याची चर्चा सामान्य नागरिक करत आहेत.
हेही वाचा -दूषित पाणी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर छापा; कारखाना सील