महाराष्ट्र

maharashtra

बदलापूर-रमेशवाडी मार्गावर डंपर-दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार

By

Published : Nov 6, 2019, 8:31 PM IST

मुरबाडमधील वाशिवली भाकरी येथील राहणारा भावेष कथोरे व त्याचा भाऊ बदलापूर येथे मोटारसायकलने जात असताना रमेशवाडी दरम्यान समोरुन येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांना जोरदार धडक दिली.

बदलापूर-रमेशवाडी मार्गावर डंपर आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार

ठाणे -मुरबाड-बदलापूर रस्त्यावर डंपर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बदलापूर-रमेशवाडी मार्गावर घडली. भावेश कथोरे असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे.

भावेश कथोरे

हेही वाचा -देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटून घेणार शपथ?

मुरबाडमधील वाशिवली भाकरी येथील राहणारा भावेश कथोरे व त्याचा भाऊ बदलापूर येथे मोटारसायकलने जात असताना रमेशवाडी दरम्यान समोरुन येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत भावेशचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details