ठाणे:पोलीस वेषात आलेला तोतया सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. एल. जगताप नाव परिधान करून साथीदाराच्या संगनमताने फिर्यादीच्या मोबाईल मधून EXODUS नावाचे बिट कॉईन ॲप मधून 5 लाख 72 हजार 964 रक्कम ट्रान्सफर करून घेऊन गंडा घातल्याची घटना घडली. सदरचा गुन्हा 13 नोव्हेंबर, 2022 रोजी घडला. पोलिसांनी 14 नोव्हेंबर, 2022 रोजी कशेळी गाव, भिवंडी परिसरातून त्याला अटक केली.
असा घातला गंडाःतक्रारदार असलेल्या ध्रुव सुशिलकुमार भारती, वय- १९ वर्षे धंदा- शिक्षण, रा. रू.नं. १४, चाळ नं. १४, महात्मा फुलेनगर, कळवा, जि. ठाणे यांनी कळवा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी आरोपी आर एल जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेला पोलीस विभागातील वेश परिधान करून फिर्यादी यांच्या ऑटोरिक्षा गणपती पाड्यावर आढळून त्या रिक्षा खाली उतरून फिर्यादीला दमदाटी करीत त्याच्याकडून त्याचा मोबाईल घेण्यात आला. त्यानंतर फिर्यादीच्या मोबाईलला हाताळून आरोपी जगताप यांनी त्यांच्या मोबाईल मधील एक्सोडस या बिटकॉइन ॲप मधून 7669 यूएस डॉलर म्हणजेच भारतीय चलनात 5 लाख 72 हजार 964 रुपये ट्रान्सफर स्वतःच्या खात्यावर करून घेतले आणि फिर्यादीला गंडा घातला.