महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भातसा धरण शंभर टक्के भरले; दरवाजे उघडल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

5 ते 6 दिवसांपासून जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तानसा, वैतरणा, मोडक सागर पाठोपाठ भातसा धरणही शंभर टक्के भरले आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले आहेत.

भातसा धरण शंभर टक्के भरले

By

Published : Jul 30, 2019, 11:57 AM IST

ठाणे- गेल्या 5 ते 6 दिवसांपासून जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तानसा, वैतरणा, मोडक सागर पाठोपाठ भातसा धरणही शंभर टक्के भरले आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले आहेत. भातसा नदीलगतच्या बहुतांश गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भातसा धरण शंभर टक्के भरले

सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भातसा धरणाच्या पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंतच्या स्थितीत धरणाची पाण्याची पातळी १३७.०५ मीटर वाढल्याने धरणाच्या संभाव्य पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे तलावातील जलाशय प्रचालन सूचीनुसार नियमित करण्यासाठी धरणाचे पाच दरवाजे काल सायंकाळी पाच वाजल्यापासून पाच मीटरपर्यंत उघडण्यात आले. भातसा धरणातून सुमारे 155 क्युमेक्स (घन मीटर प्रति सेकंद) पाण्याचा विसर्ग होत आहे, यामुळे शहापूर, मुरबाड आणि भिवंडी तालुक्यातील भातसा नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा व सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे भातसा धरण तुडूंब भरून वाहू लागल्याने तूर्तास तरी मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details