महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकलमध्ये चढताना मुलगी आणि आईची ताटातूट, पोलिसांच्या प्रयत्नामुळे चिमुकली पुन्हा भेटली आईला

सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास मुंब्रा रेल्वे स्थानकावर एका महिलेने आपल्या मुलीसह लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीला लोकलमध्ये चढवताच लोकल सुरू झाल्याने, या महिलेला लोकलमध्ये चढता आले नाही. आईपासून दुरावलेल्या या मुलीची पोलिसांनी पुन्हा तिच्या आईशी भेट घालून दिली.

Thane Latest News
पोलिसांच्या प्रयत्नामुळे चिमुकली पुन्हा भेटली आईला

By

Published : Dec 15, 2020, 5:07 PM IST

ठाणे -सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास मुंब्रा रेल्वे स्थानकावर एका महिलेने आपल्या मुलीसह लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीला लोकलमध्ये चढवताच लोकल सुरू झाल्याने, या महिलेला लोकलमध्ये चढता आले नाही. रिजबान सफद खान असे या महिलेचे नाव आहे. ती लोकलमध्ये चढू न शकल्याने मुलगी आणि आईची ताटातूट झाली. या सर्व प्रकाराने रिजबान गोंधळून गेली होती.

मात्र हा सर्व प्रकार तिथे उपस्थित असलेले महाराष्ट्र सिक्युरीटी फोर्स आणि आरपीएफचे पोलीस पाहत होते. महाराष्ट्र सिक्युरीटी फोर्सचे जवान शाहरुख शेख, राहुल सोनावणे, संतोष देवकर यांनी रिजबानला पकडले आणि तिला धावत्या रेल्वे खाली येण्यापासून वाचवले. पण तिची ६ वर्षांची मुलगी लोकल ट्रेनमध्येच राहिल्यामुळे रिजबानने आरडाओरड करायला सुरुवात केली.

पोलिसांच्या प्रयत्नामुळे चिमुकली पुन्हा भेटली आईला

महिला पोलिसाच्या प्रयत्नामुळे आई आणि मुलीची भेट

दरम्यानआरपीएफ महिला पोलिस अनुराधा पगोटे यांनी जीवाची परवा न करता धावती ट्रेन पकडली, आणि रडत असलेल्या आई पासून वेगळ्या झालेल्या त्या मुलीला ताब्यात घेतले. या मुलीसह पगोटे या कळवा रेल्वेस्थानकावर उतरल्या आणि त्यांनी त्यानंतर मुंब्रा रेल्वेस्थानक गाठले. या मुलीची तिच्या आईशी भेट घालून दिली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पगोटे यांच्या कार्याचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details