ठाणे : जिल्ह्यात ५ दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ( Heavy Rains In Thane ) शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. त्यातच अनेक नद्यांनी धोक्याची पातळी वाढल्याने कल्याणच्या खाडीत येऊन पूर परिस्थिती ( Flood in Kalyan ) निर्माण झाली आहे. तसेच खाडी किनारी असलेल्या शेकडो घरात पुराचे पाणी शिरल्याने ( house flooded ) जलमय झाली आहे. तर, अचानक वाढलेल्या पाण्यामुळे नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली आहे.
Heavy Rains In Thane : मुसळधार पावसामुळे कल्याणच्या खाडीला पूर; खाडी किनारी शेकडो घरे जलमय .. - Heavy Rains In Thane
ठाणे जिल्ह्यात पावसामुळे शहरातील ( Heavy Rains In Thane ) अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. ५ दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
हेही वाचा -Monsoon Update Maharashtra : राज्यात येत्या काळात पावसाचा जोर ओसरेल - डॉ. रामचंद्र साबळे
शेकडो नागरिकांचे स्थलांतर - कल्याण खाडी ( Kalyan Bay ) किनारी असलेल्या तबेल्यात पाणी शिरल्याने खाडी लगत असलेल्या तबेल्यातील ५०० म्हशींना देखील बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच यापूर्वीच नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून सखल भागात पाणी भरल्यास नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच महानगर पालिकेचे निवारण केंद असलेल्या शाळेत स्थलांतर करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तसेच ताबेल्याना देखील जनावरे सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी नोटिसी दिल्या आहेत. जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवित आणि वित्तहानी होणार नाही.
हेही वाचा -Video : रुद्रप्रयागमध्ये कोसळली दरड.. मोबाईलमध्ये भीषण दृश्ये झाली कैद