महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीच्या महिलांचे आंदोलन, चुलीवर खिचडीसह थापल्या भाकरी - NCP women agitation on Gas price hike

इंधन आणि गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी भिवंडी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वात भिवंडीतील आनंद दिघे चौकात अनोखे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिलांनी चक्क चुलीवर खिचडी शिजवून आणि भाकरी थापून केंद्र सरकारचा धिक्कार केला.

गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीच्या महिलांचे आंदोलन
गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीच्या महिलांचे आंदोलन

By

Published : Feb 6, 2021, 5:02 PM IST

ठाणे - इंधन आणि गॅस दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट पुरते कोलमडले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी भिवंडी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वात भिवंडीतील आनंद दिघे चौकात अनोखे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिलांनी चक्क चुलीवर खिचडी शिजवून आणि भाकरी थापून केंद्र सरकारचा धिक्कार केला.

गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीच्या महिलांचे आंदोलन
बजेट कोलमडले ..गेल्या काही दिवसांपासून देशातील महागाईचा दर प्रचंड वाढलेला आहे. दर आठवड्याला गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत. तर, इंधनाचेही दर प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेटही कोलमडले आहे. याचा निषेध करण्यासाठी राज्यभर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलने करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून भिवंडीतही आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे महागाईचा भारराष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या स्वाती कांबळे यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे देशवासियांना महागाईचा भार सहन करावा लागत आहे. दर आठवड्याला सिलिंडरचे दर वाढवले जात आहेत. मागील महिन्यात 190 रुपयांनी दरवाढ केल्यानंतर मागील आठवड्यात 25 रुपयांनी दरवाढ केली आहे. त्यातच आता एक लाखांची उत्पन्न मर्यादा असलेल्यांनाच शिधावाटप पत्रिका देण्यात येणार आहेत. म्हणजेच एक लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहेत. त्याचा निषेध करण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिलासह भिवंडी राष्ट्रवादीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.हेही वाचा -टोलनाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांना जामीन मंजूर

ABOUT THE AUTHOR

...view details