महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंब्रा बायपासवरून टँकर कोसळला, चालक जखमी - ठाणे टँकर खाली पडून चालक गंभीर जखमी

या अपघातानंतर वाहतूक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी पोहोचल्या असून त्या टँकरला बाहेर काढण्याचे काम करत आहेत. हा टँकर केमिकल घेऊन गुजरात वरून तळोजा येथे निघाला होता. त्याचा चालक वीरेंद्र यादव हा या अपघातात जखमी झाला आहे.

driver injured in tanker collapsed incident at mumbra bypass in thane district
driver injured in tanker collapsed incident at mumbra bypass in thane district

By

Published : Aug 22, 2020, 2:59 PM IST

ठाणे - जिल्ह्यातील अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे. आज मुंब्रा बायपास वर पुन्हा एक अपघात झाला असून त्यात टँकर खाली पडून चालक गंभीर जखमी झाला. त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघातानंतर वाहतूक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी पोहोचल्या असून त्या टँकरला बाहेर काढण्याचे काम करत आहेत. हा टँकर केमिकल घेऊन गुजरात वरून तळोजा येथे निघाला होता. त्याचा चालक वीरेंद्र यादव हा या अपघातात जखमी झाला आहे.

मुंब्रा बायपासवर अतिशय अवघड अशी वळणे आहेत. त्यामुळे अंदाज न आल्याने अनेकदा अवजड वाहने बायपासवरून खाली कोसळतात. या आधी अनेकदा असे अपघात झाले असून त्यात अनेकांनाचा जीव ही गेलेला आहे. या अपघातामुळे बायपास खाली राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या बायपासला संरक्षक भिंती उभाराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. या अपघाताची चौकशी मुंब्रा पोलीस करत असून त्यानंतर या बाबाबत नोंद केली जाईल असे मुंब्रा पोलिसांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details