महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. पायल तडवी मृत्यू प्रकरण: कल्याणमध्ये हुंकार रॅली, आरोपींना कठोर शिक्षेची मागणी - hunkar rally

डॉ. पायल तडवी यांची आत्महत्या नसून हत्या झाली आहे. त्यांची हत्या केलेल्या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. या मागणीसाठी कल्याणमध्ये शिक्षण आरोग्य अधिकार मंच या संस्थेतर्फे हुंकार रॅली काढण्यात आली.

कल्याणमध्ये हुंकार रॅली

By

Published : Jun 5, 2019, 5:56 AM IST

ठाणे - डॉ. पायल तडवी यांची आत्महत्या नसून हत्या झाली आहे. त्यांची हत्या केलेल्या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, या मागणीसाठी कल्याणमध्ये हुंकार रॅली काढण्यात आली. शिक्षण आरोग्य अधिकार मंच या संस्थेतर्फे आंबेडकर उद्यान ते तहसील कार्यलया दरम्यान ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी मागासवर्गीयांवर आणि अल्पसंख्याकांवर अ‍ॅट्रॉसिटी, हिंसाचाराचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. डॉ. पायल तडवी यांनीही अ‍ॅट्रॉसिटी, रॅगिंग आणि जातीय छळवणुक केली आहे. डॉ. पायल तडवी यांची हत्या करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. तसेच आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे. याआधीही रोहीत वेमुलाला हैद्राबाद विद्यापीठात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने, त्याने आत्महत्या केली होती. देशभरात अशा २४ घटना विद्यापीठात घडल्या आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची छळवणूक सूरुच असून, ती बंद झाली पाहिजे. याप्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत आरोपींची सुटका करायची नाही. अशा विविध मागण्यांसह डॉ. पायल यांना न्याय मिळावा, अशी मागणीही मंचच्या वतीने करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details