महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ear surgery Thane: कानाचे व्यंग असलेल्या कझाकिस्तानातील मुलांना मिळाले नवीन कान; ठाण्यातील डॉक्टरांनी घडवला चमत्कार - नवीन कान

Ear surgery Thane : आपल्या शरीरातील पाच ज्ञानेंद्रिय म्हणजेच कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा ही अत्यंत महत्वाची आहेत. यापैकी कोणतेही ज्ञानेंद्रिय कमी पडले तरी त्याचा मानवी शरीरावर परिणाम होतो. कानाची समस्या असलेले आठ मुले सध्या ठाण्यात दाखल झाली आहेत. या मुलांवर डाॅ. अशेष भूमकर (Dr. Ashesh Bhumkar) हे शस्त्रक्रिया करून त्यांना सजीव कान बसवणार आहेत.

Thane News
कानाचे व्यंग

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 10:04 PM IST

माहिती देताना डॉ आशिष भूमकर

ठाणेEar surgery Thane : जन्मताच कान नसलेल्या कझाकस्तान देशातील आठ मुले सध्या ठाण्यात दाखल झाली आहेत. त्यातील दोन मुलांच्या कानावर ठाण्यातील (Surgery on Kazakhstan people) मवंत ENT स्पेशालिस्ट डॉ. आशिष भूमकर (Dr. Ashesh Bhumkar) यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केलीय. आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या आई-वडिलांचा आवाज ऐकू आल्यानं ही मुले अत्यंत भावूक झाली होती. या मुलांचा आनंद पाहून पालकांच्या डोळ्यातील आनंदाश्रू देखील थांबत नव्हते. उरलेल्या सहा जणांच्या कानांवर देखील पुढच्या तीन दिवसात शस्त्रक्रिया होणार आहे. तसेच लवकरच ही मुले मायदेशी प्रयाण करणार आहेत.


ENT स्पेशलिस्ट डॉ. आशिष भूमकर : 'वसुधैव कुटुम्बकम' म्हणजेच संपूर्ण विश्व हे एक कुटुंबच आहे. अशी भारतीय संस्कृती आहे. जगातील प्रत्येक गरजवंताला आपल्या परीनं मदत करणं हे प्रत्येक भारतीय आपलं कर्तव्य समजतो. त्यातच डॉक्टर म्हणजे ईश्वराचं दुसरं रूप मानलं जातं व प्रत्येक रुग्णाला एकसमान ट्रीटमेंट देण्याला डॉक्टर प्राधान्य देतात. असेच एक निष्णात डॉक्टर म्हणजे ENT स्पेशालिस्ट डॉ. आशिष भूमकर (ENT Specialist) आहेत.

ठाण्यात मुलांवर होणार मुलांवर : जन्मताच कर्णबधिर असलेल्या कझाकस्तान देशातील तब्बल आठ मुलांवर येत्या काही दिवसात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. जवळपास आठ हजार मुलांमागे एकाला हा कर्णदोष आढळतो. ज्यामध्ये मुलाच्या कानाचा बाहेरील भागाची वाढ खुंटते व काम बंद झालेले मुलाला ऐकू येत नाही. यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासावर प्रचंड परिणाम होऊन त्याची नैसर्गिक वाढ खुंटते. अशीच आठ मुले सध्या ठाण्यात आली आहेत. त्यातील दोन मुलांवर डॉ. आशिष भूमकर यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांच्या बाह्य कानाची पुनर्रचना केली आहे. वर्तकनगर येथील एका खाजगी हॉटेलवर त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक दिवशी दोन मुलांवर बाह्य कर्ण पुनर्रचना ही मुलांवर करण्यात येत आहे.



छातीमधील स्नायू वापरून शस्त्रक्रिया :या शस्त्रक्रियेसाठी बाळाच्या छाती मधील एक स्नायू काढून त्याला कानाचं स्वरूप दिलं जातं व कानाच्या ठिकाणी लावलं जातं. जर कानाच्या आतमधील भागात इजा असेल तर कानाला ड्रिल करून तो दोष देखील दूर केला जातो. डॉ. भूमकर आणि डॉक्टर गायत्री पाटणकर यांनी महावीर जैन रुग्णालयाच्या मदतीनं या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. त्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे डॉ. भूमकर अशा प्रकारचे शस्त्रक्रिया भारतात आणि परदेशात करत आहेत. अनेक रुग्णांना त्यांनी एक नवीन आयुष्य जगण्याची उमेद मिळवून दिली आहे. चेहरा आणि शरीराचा भाग बाहेर भागावर जर एखादे व्यंग असेल तर त्या मुलाचा सर्वांगीण विकासच खुंटतो, त्यामुळे कमी वयातच या मुलांमधील दोष दूर केल्यानं त्यांना आयुष्य पुन्हा नव्यानं जगण्याची उभारी मिळते असं डॉ. भुमकर यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. Veterinary Hospital : आता गायी-म्हशींचाही निघणार एक्स-रे; अत्याधुनिक पशु चिकित्सालयाचे गडकरींच्या हस्ते उद्घाटन
  2. Tumor Operation In MP : महिलेच्या पोटातून काढली 15 किलोची गाठ; शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांची कसरत
  3. Cataract treatment in monsoon : पावसाळ्याच्या दिवसात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावी की नाही ? जाणून घ्या उपाय...

ABOUT THE AUTHOR

...view details