ठाणे -शेअर बाजारात पैसै गुंतवणूक करुन सात ते आठ टक्के दराने व्याज देतो, असे आमिष दाखवून अनेकांकडून लाखोंची रक्कम घेऊन पसार झालेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. डोंबिवलीच्या टिळकनगर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून संबंधित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. चंकेश जैन (25) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने आतापर्यंत एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
शेअर बाजारात 8 ते 10 टक्के व्याजाचे आमिष
आरोपी चंकेश जैन हा डोंबिवली पूर्वेकडील बालाजी मंदीर रोडला असलेल्या एका चाळीत राहतो. त्याने अनेक जणांना मी शेअर बाजारात गुंतवणूक करतो, तुमचे पैसे शेअर बाजारात गुंतवा. मी तुम्हाला 8 ते 10 टक्के व्याजाने पैसे परत करतो, असे आमिष दाखवले. बक्कळ व्याजाच्या आमिषाला भुलून अनेकांनी चंकेशला पैसे दिले. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने सुरुवातीला काही जणांना मोबदलाही दिला. त्यामुळे अनेक जणांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली. त्यानंतर मात्र तो डोंबिवलीतून अचानक बेपत्ता झाला.
मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात