ठाणे -मानपाडा पोलीस कोठडीत असलेल्या एका आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली ( Molestation Accuse Dies In Judicial Custody ) आहे. विनयभंगाच्या एका प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. मात्र, त्याचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
भुसावळ येथून केली होती अटक
दत्तात्रय दिनकर वारके, असे मृत आरोपीचे नाव आहे. गेल्या वीस दिवसांपूर्वी दत्तात्रय वारकेवर मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल होता. पोलिसांनी त्याला शनिवारी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथून अटक केली होती. काल ( रविवारी ) त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. कारागृहात नेण्यापूर्वी कोरोना चाचणी बंधनकारक आहे. त्यामुळे वारकेला मानपाडा पोलीस ठाण्यातील विलगीकरण कक्षात ठेवले होते.