ठाणे - 'डॉग वर्ल्ड' या संस्थेने एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 'माय पेट माय हिरो' याच उद्देशाने ठाण्यातील खेवरा सर्कल या ठिकाणी 'डॉग शो'चे आयोजन करण्यात आले होते. हे या कार्यक्रमाचे तिसरे वर्ष असून यात मोठया संख्येने श्वान प्रेमी आणि श्वान पाळणाऱ्या लोकांनी सहभाग घेतला होती.
ठाण्यात अनोख्या 'डॉग शो'चे आयोजन या कार्यक्रमात जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर, मिनीपोम, चिहुआहुआ, गोल्डन रिट्रीवर, हस्की, पॉमेरियन या जातीच्या श्वानांनी सहभाग घेतला होता. या श्वानांसाठी आयोजकांनी जंप शो, रॅम्प वॉक, अडथळ्यांची शर्यत अशा विविध स्पर्धांही ठेवल्या होत्या.
हेही वाचा -रिअलमीचा पहिला ५जी स्मार्टफोन देशात लाँच
लोकांमध्ये श्वान पाळण्याची आवड वाढीस लागावी, त्यांच्याबद्दल प्रेम, आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने डॉग वर्ल्ड ही संस्था या कार्यक्रमाचे आयोजन करते, असे आयोजक भूषण देसाई यांनी सांगितले.
श्वान हा मालकाशी एकनिष्ठ राहून कायम सेवा देतो. मनुष्याला जशी विरंगुळ्याची आवश्यकता असते, तशीच या श्वानांनाही मिळायला हवी. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे ही संधी मिळते. ठाण्याप्रमाणे इतर ठिकाणीही या उपक्रमांची सुरुवात व्हावी, असे मत श्वानप्रेमींनी व्यक्त केले.