महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Doctor Attack : डॉक्टरने घातला मेडिकल व्यवसायिकाच्या डोक्यात लोखंडी राॅड - वैद्यकीय व्यावसायिकावर डॉक्टरांचा हल्ला

मानपाडा गावातील उंबार्ली रोडवर ( Attack on Umberli Road in Manpada village ) असलेल्या क्लिनिकमध्ये डॉक्टरने मेडिकल व्यवसायिकाच्या ( doctor attack on medical professional ) डोक्यात लोखंडी घातला आहे.

doctor stabbed a medical practitioner
doctor stabbed a medical practitioner

By

Published : Dec 1, 2022, 8:46 PM IST

ठाणे :क्लिनिकमध्येच डॉक्टरने मेडिकल व्यवसायिकाच्या डोक्यात लोखंडी सळई ( doctor attack on medical professional ) घातल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मानपाडा गावातील उंबार्ली रोडवर ( Attack on Umberli Road in Manpada village ) असलेल्या क्लिनिकमध्ये घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात ( Manpada Police Station ) हल्लेखोर डॉक्टर विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. डॉक्टर पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर मोहम्मद हुसेन जैरुउद्दीन अन्सारी (वय २४) असे गंभीर जखमी झालेल्या मेडिकल व्यवसायिकाचे नाव आहे.

पाच हजार रुपये डीपॉझीट वरून वाद -आरोपी डॉक्टर पाटील यांच्या मालकीचा मानपाडा भागात दुकानाचा गाळा आहे. हा गाळा मेडीकल व्यवसायिकाने भाडे तत्वावर देण्याची बातचीत करून सदर गाळ्याचे डॉक्टरला पाच हजार रुपये डीपॉझीट म्हणून जखमी अन्सारी याने दिले. मात्र काही दिवसांपूर्वीच डॉक्टरने मेडीकल व्यवसायिकाला गाळा न देतात, तो गाळा दुसरा भाडेकरूला दिला. त्यामुळे गाळ्याचे दिलेले डीपॉझीट परत मिळावे म्हणून अन्सारी याने डॉक्टरकडे तगादा लावला होता. मात्र, डॉक्टर पाटील हे अन्सारी याला डीपॉझीट देण्यास टाळाटाळ करीत होते.


विविध कलमानुसार गुन्हा दाखल -अन्सारी, त्यांचा मित्र मानपाडा गावातील उंबार्ली रोडवर असलेल्या आरोपी डॉक्टराच्या क्लिनिकमध्ये ३० नोव्हेंबर रोजी दुपारी साडे बारा वाजल्याच्या सुमारास गेले होते. त्यावेळी आरोपी डॉक्टराने डीपॉझीट परत देण्यास नकार देऊन दोघांना शिवीगाळ करून वाद घातला. हा वाद विकोपाला जाऊन डॉक्टराने क्लिनिकमध्ये असलेली लोखंडी सळई हातात घेऊन अन्सारी यांच्या डोक्यात घातली. या घटनेत अन्सारी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान हल्लेखोर डॉक्टराविरोधात अन्सारी यांच्या तक्रारीवरून विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला साहा. पोलीस निरीक्षक एम. डी. जोशी करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details