गतिमंद तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया ठाणे :ही घटना बदलापूर पश्चिम भागात पीडित राहात असलेल्या एका क्लिनिकमध्ये घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अत्याचारासह विविध कालमांनुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत. हेमंत सोनवणे असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
पीडिता सामान आणण्यासाठी गेली अन्... :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही गतिमंद असून ती बदलापूर पश्चिम भागात कुटुंबासह राहते. तर याच भागात आरोपी डॉक्टर हेमंत सोनवणे याचे क्लिनिक आहे. त्यातच पीडित तरुणीला तिच्या आईने परिसरात असलेल्या एका किराणा दुकानातून ९ जुलै रोजी (रविवारी) दुपारच्या सुमारास मसाला आणण्यासाठी पाठवले होते. पीडित तरुणी घराच्या काही अंतरांवर गेल्यानंतर डॉ. हेमंतने पीडित तरुणीला क्लिनिकमध्ये बोलावले. त्यानंतर क्लिनिकचे शटर बंद करून आतमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
चपलीवरून घेतला तरुणीचा शोध :पीडित मुलगी बराचवेळ झाला तरी घरी परत आली नसल्याचे पाहून तिची बहीण आणि आई तिचा शोध घेण्यासाठी बाहेर पडल्या. त्याच दरम्यान आरोपीच्या क्लिनिकच्या बंद शटर बाहेर पीडित तरुणीची चप्पल दिसल्याने, तिची बहीण क्लिनिकचे शटर उघडून आतमध्ये शिरली होती. त्यावेळी क्लिनिकमध्ये आरोपी डॉ. हेमंत तिच्यावर अत्याचार करत असल्याचे तिला दिसले. पीडितेच्या बहिणीने पीडितेची त्याच्या तावडीतून सुटका केली. आणि परिसरातील नागरिकांच्या मदतीने बदलापूर पश्चिम पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
आरोपी डॉक्टरला अटक :यानंतर घटनास्थळी पोलीस पथक दाखल होत आरोपी डॉक्टरला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर म्हणाले की, आरोपीवर भादंवि कलम ३७६ अंतर्गत तात्काळ अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर यापूर्वी भादंवि कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास करून आरोपीला न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा:
- Minor Girl Molestation Case: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; रिक्षा चालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
- Beed Rape Case : 14 वर्षीय मुलीवर 24 वर्षीय नराधमाने केला अत्याचार, पिडिता 7 महिन्याची गर्भवती
- Buldhana Crime : बुलडाण्यात खळबळ! दिल्लीतील गँगस्टरच्या नावाने मागितली ४० लाखांची खंडणी