महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना योद्धा: कळव्यातील डॉक्टर गेल्या वर्षभरापासून मोफत करताहेत रुग्णांची सेवा - thane corona

ठाण्यातील कळवा येथील महात्मा नगर या झोपडपट्टीमध्ये डॉक्टर पांडे यांचा एक छोटासा दवाखाना आहे. येथील कोरोना रुग्णांना तपासून त्यांना योग्य तो सल्ला देऊन तसेच योग्य ते औषधोपचार करुन डॉक्टर श्याम पांडे यांनी अनेकांना कोरोनातून बरे केले आहे.

डॉ. पांडे, ठाणे कोरोना, कळवा न्यूज
डॉ. पांडे

By

Published : Apr 25, 2021, 2:26 PM IST

ठाणे -गेले वर्षभर आपल्या सर्वांवरती कोरोनाचे संकट ओढावले आहे. दुसऱ्या लाटेने तर देशभरात हाहाकार माजवला आहे. त्यात एकीकडे रुग्णांना बेड, ऑक्सिजन किंवा वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नाहीए, त्यामुळे काही रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहे. अशा परिस्थितीत ठाण्यातली कळवा येथील डॉक्टर श्याम पांडे हे कळव्यातील महात्मा नगर झोपडपट्टी येथील नागरिकांसाठी देवदूत ठरले आहेत.

ठाण्यातील कळवा येथे कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. तसेच कळव्यात कोरोनाचे एक ही कोविड हॉस्पिटल नाही. येथील कोरोना रुग्णांचे आकडे पाहता त्यामुळे कळव्यातील नागरिकांच्या मनामध्ये कोरोनाला घेऊन एक धास्ती निर्माण झाली आहे. ठाण्यातील कळवा येथील महात्मा नगर या झोपडपट्टीमध्ये डॉक्टर पांडे यांचा एक छोटासा दवाखाना आहे. येथील कोरोना रुग्णांना तपासून त्यांना योग्य तो सल्ला देऊन तसेच योग्य ते औषधोपचार करुन डॉक्टर श्याम पांडे यांनी अनेकांना कोरोनातून बरे केले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता त्यांचे प्राथमिक लक्षण पाहून त्यांना योग्य ते औषधोपचार करून घरीच क्वारंटाईन राहण्याचा सल्ला डॉक्टर पांडे यांनी दिला. तसेच लक्षणे जास्त असल्यास नागरिकांना ठाणे महापालिकेतील ग्लोबल हॉस्पिटल किंवा अन्य हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास सांगितले. कोरोना रुग्णांना ते ग्लोबल हॉस्पिटल किंवा अन्य हॉस्पिटलमध्ये दाखल होईपर्यंत त्यांची काळजी घेत असतात. तसेच होम क्वारंटाईन रुग्णांच्या घरी जाऊन ते त्यांची तपासणी करतात. गेल्या वर्षभरात डॉक्टर पांडे यांनी सेवा अविरत चालू ठेवली आहे.

कळव्यातील डॉक्टर गेल्या वर्षभरापासून मोफत करताहेत रुग्णांची सेवा..

एकीकडे लूट मात्र डॉक्टरांची मोफत सेवा -

कोरोनाच्या काळात हॉस्पिटल रुग्णांकडून लाखो रुपये वसूल करत आहे. तर, दुसरीकडे एकही रुपया न घेता कळव्यातील डॉक्टर श्याम पांडे यांनी या रुग्णांवर उपचार केले आहेत. डॉ. पांडे यांची ही सेवा कळवावासियांसाठी संजीवनी ठरली आहे.

सकारात्मक! पंढरपूरमध्ये कोरोनाबाधित महिलेची प्रसुती; बाळ आणि माता दोघेही सुखरुप

ABOUT THE AUTHOR

...view details