ठाणे -गोकुळाष्टमी असल्याने मित्रांसोबत जाऊ नको म्हटल्याचा राग आल्याने पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे पती पत्नी दोघेही पेशाने डॉक्टर आहेत. गोविंद गोपाळ निगुडकर असे डॉक्टर पतीचे नाव असून रुपाली निगुडकर असे डॉक्टर पत्नीचे नाव आहे.
गोकुळाष्टमीसाठी मित्रांसोबत जाण्यास मनाई केल्याने पतीची डॉक्टर पत्नीला मारहाण - thane crime news
गोकुळाष्टमी असल्याने मित्रांसोबत जाऊ नको म्हटल्याचा राग आल्याने पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे पती पत्नी दोघेही पेशाने डॉक्टर आहेत.
22 ऑगस्टला घरगुती वादातून या दांम्पत्याचे भांडण झाले होते. त्यावेळी रुपाली यांनी राबोडी पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २३ ऑगस्टला गोकुळाष्टमी असल्याने रुपालीने गोविंदला सण असल्याने मित्रांसोबत कुठे जाऊ नको असे बोलल्याचा राग आल्याने गोविंदने पत्नी रुपालीला मारहाण केसी. गोविंदने तिला शिवीगाळ करीत लाथा-बुक्यानी मारहाण केली. तसेच गोळ्या कुटण्याचे लोखंडी मुसळ त्यांने रुपालीच्या कपाळावर मारून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.