ठाणे:उल्हासनगर कॅम्प ५ येथील नेताजी चौकात उल्हासनगर राष्ट्रवादीच्या वतीने २७ मे रोजी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सिंधी समाजाविरुद्ध वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्यानंतर उल्हासनगर तसेच ठाण्यातील सिंधी बांधव आक्रमक झाले आहेत. सिंधी समाजाच्या वतीने सोमवारी कोपरी ठाणे पूर्वमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला. तसेच, सिंधी समाजातील लोकप्रतिनिधींनी कोपरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन निवेदन दिले. एका लोकप्रतिनिधीला अशी भाषा शोभत नाही, असा आरोप करीत कोपरीतील सिंधी समाजाने दोनच दिवसांपूर्वी निषेध सभा घेऊन कोपरी बंदची हाक दिली होती. त्यानुसार, सोमवारी संपूर्ण कोपरी मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.
Sindhi Community On MLA Awhad: तर नार्को टेस्ट करून जितेंद्र आव्हाडांची आमदारकी रद्द करा...
सिंधी समाजाबद्दल असे आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ ठाण्यातील सिंधी समाज आक्रमक झाला आहे. या निवेदनात आव्हाडांची ब्रेन मॅपिंग तसेच नार्को टेस्ट करून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
व्हिडिओ मॉर्फ केल्याचा आरोप फेटाळला:भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण, शिवसेनेचे हेमंत पमनानी, प्रकाश कोटवानी तसेच दीपक घनशानी आदी समवेत सिंधी समाजातील नागरिकांनी कोपरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. आमदार जितेंद्र आव्हाड माफी मागत नाहीत तोपर्यत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला. याप्रसंगी, बोलताना सिंधी समाजाचे नेते दीपक घनशानी यांनी व्हिडिओ मॉर्फ केल्याच्या आव्हाडांच्या आरोपामधील हवाच काढली. संबधित आक्षेपार्ह व्हिडीओ मॉर्फ असेल तर त्याची फॉरेन्सिक तपासणी करावी. त्याचबरोबर आव्हाडांची ब्रेन मॅपिंग करून नार्को टेस्टही करावी. त्यात आव्हाड दोषी आढळले तर त्यांची आमदारकी रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन राज्याचे प्रधान सचिव आणि विधानसभा अध्यक्षांना देण्यात आल्याचे पमनानी म्हणाले.
मॉर्फ व्हिडिओवर गुन्हा दाखल:हा प्रकार राजकीय विरोधात झाला असून माझा व्हिडिओ मॉर्फ करून सिंधी समाजाच्या भावना भडकवण्यात आल्या असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या संदर्भात पोलिसांनी आधी शहानिशा करावी आणि मगच कारवाई करावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
हेही वाचा: