ठाणे :सुमारे एक वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेची निवडणुक ( Thane Municipal Elections ) जवळ आली असताना, दिवा डम्पिंग बंद केले ( Close dumping ground immediately ) सांगता. मात्र अद्यापही दिव्यात कचरा टाकण्याचे थांबवत नाही. आजही डम्पिंग सुरूच आहे. त्यामुळे पहिल्यांदा ५ लाख दिवेकारांची फसवणूक थांबवा. ( Divekar fraud regarding dumping ground ) तसेच आठ दिवसात डम्पिंग बंद करा, अन्यथा महापालिका प्रशासनाविरोधात ( Repeated complaints about Diva dumping ) आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप दिवा शीळ मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी दिला आहे.
दिव्यात डंम्पिंग सुरुच - दिवा शहरात ठाणे महानगरपालिका प्रशासनामार्फत इंपिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. मागील जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुकांचे वातावरण तयार झाले, तेव्हा डम्पिंग ग्राउड बंद झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या. भंडारली येथे महापालिकमार्फत कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी निधीही खर्च केला आहे. परंतु आजही दिवा शहरात मोठ्या प्रमाणात डम्पिंगच्या गाड्या चालू आहे, असे मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.