महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dispute On 5 Rupees Ice : ५ रुपयांच्या बर्फावरून वाद, मध्यस्थी करणाऱ्या पोलिसालाच भर चौकात मारहाण - Thane latest news

एका शरबत विक्रेत्याशी ५ रुपयांच्या बर्फावरून वाद ( Dispute On 5 Rupees Ice ) होऊन शिवीगाळ करत गोंधळ सुरू होता. गोंधळ करणाऱ्या व्यक्तीला समजावून सांगत मध्यस्थी करणाऱ्या वाहतूक पोलिसालाच भर चौकात मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Ulhasnagar Police station
उल्हासनगर पोलीस ठाणे

By

Published : Mar 24, 2022, 6:04 PM IST

ठाणे - एका शरबत विक्रेत्याशी ५ रुपयांच्या बर्फावरून वाद ( Dispute On 5 Rupees Ice) होऊन शिवीगाळ करत गोंधळ सुरू होता. गोंधळ करणाऱ्या व्यक्तीला समजावून सांगत मध्यस्थी करणाऱ्या वाहतूक पोलीसालाच वाद घालणाऱ्याने भर चौकात मारहाण केल्याची घटना घडली आहे. हि घटना उल्हासनगरमधील नेहरू चौकात घडली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ( Ulhasnagar Police station ) गुन्हा दाखल करून मारहाण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. राजेश भरगुजदास कटारिया (वय ४५, रा. नेहरू चौक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर आकाश पांडुरंग चव्हाण (वय ५२) असे मारहाण झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे.

वर्दीवर असतानाच शर्टाची कॉलर पकडून मारहाण - उल्हासनगर नेहरू चौकात वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस चौकी आहे. या चौकीत पोलीस कर्मचारी चव्हाण कार्यरत असून २३ मार्चला बुधवारी दुपारच्या सुमारास चौकात वाहतूक सुरळीत करत असतानाच चौकात एका शरबत विक्रेत्याकडून आरोपी राजेश याने ५ रुपयांचा बर्फ घेतला. मात्र त्या बर्फाचे पैसे मागण्यावरून आरोपीने शरबतवाल्याला शिवीगाळ करत गोंधळ घातला. हा गोंधळ पाहून मध्यस्थी करण्यासाठी वाहतूक वाहतूक पोलीस चव्हाण यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर चौकात शिवीगाळ करून आरडाओरडा करू नका, तुमचे काय म्हणणे आहे. ते पोलीस ठाण्यात जाऊ सांगा असे बोलताच आरोपी राजेशला राग येऊन त्याने चव्हाण वर्दीवर असतानाच त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

आरोपीने मादक पदार्थाचे सेवन केल्याचे आले आढळून -या मारहाणीत चव्हाण यांचे शर्टावरील नेमप्लेट तुटून खाली पडली. तर त्यांना वाचविण्यासाठी आलेल्या वाहतुक वार्डन निलेश बडगुजर यालाही मारहाण करत शिवीगाळ केली. काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी राजेशला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात भादंवि कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६, प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मारहाण करते वेळी आरोपीने मादक पदार्थाचे सेवन केल्याचे आढळून आले. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बी. एम. जाधव करीत आहेत.

हेही वाचा -धक्कादायक व्हिडिओ..! दैव बलवत्तर, सायकल बसखाली चिरडली पण तो बचावला...

ABOUT THE AUTHOR

...view details