ठाणे-:मुलाने शेजारीच राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमविवाहा केल्याच्या रागातून मुलाच्या कुटुंबियांनी मुलासोबत प्रेमविवाह करणाऱ्या मुलीच्या घरासमोर शिवीगाळ करत जोरदार दगडफेक केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने जावयाच्या कुटुंबावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मुलाने प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या घरावर दगडफेक - tahne crime
मुलाने शेजारीच राहणाऱ्या मुलीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीच्या घरासमोर शिवीगाळ करत घरावर जोरदार दगडफेक केली.
मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पूर्वेकडील घेसरदेवी मंदिराजवळ आरती गायकर राहतात. त्यांच्याच शेजारी पान्हेकर कुटुंब राहते. आरती गायकर यांची मुलगी कामिनी व शेजारी राहणारा राज पान्हेकर यांनी प्रेम विवाह केला होता. या विवाहामुळे पान्हेरकर कुटुंब खूपच संतापले होते. याच रागातून काल मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आरोपी संदीपपान्हेकर, नितेश म्हात्रे, मोहन तिवारी, अंकुश पाटील, परेशपान्हेकर, संतोषपान्हेकर, सुरेशपान्हेकर यांनी आरती गायकर यांच्या घरासमोर शिवीगाळ करत घरावर जोरदार दगडफेक केली.
या घटनेमुळे भयभीत झालेल्या मुलीची आई आरती गायकर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसर पोलिसानी संदीप पान्हेकर, नितेश म्हात्रे, मोहन तिवारी, अंकुश पाटील, परेशपान्हेकर, संतोषपान्हेकर, सुरेशपान्हेकर यांच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.