महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mira Bhayandar Municipal Corporation : पालिकेच्या महासभेत पुन्हा गोंधळ; दोन नगरसेविकांमध्ये जुंपली - भाजपा नगरसेविका आणि शिवसेनामध्ये जुंपली

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या ( Mira Bhayandar Municipal Corporation ) सर्वसाधारण महासभेत दोन भाजपा नगरसेविका आमने सामने ( BJP corporators face to face in general body meeting ) आल्याने चांगलाच गोंधळ झाला. त्यामुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर हसमुख गेहलोत ( Deputy Mayor Hasmukh Gehlot ) यांनी सुरक्षा रक्षकांना पाचारण करावा लागले.

दोन नगरसेविकांमध्ये जुंपली
दोन नगरसेविकांमध्ये जुंपली

By

Published : May 18, 2022, 3:49 PM IST

Updated : May 18, 2022, 3:59 PM IST

मीरा भाईंदर - मीरा भाईंदर महानगरपालिकेची महासभा मंगळवारी पार पडली. या सभेत चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. शिवसेना समर्थक आमदार गीता जैन ( MLA Geeta Jain ) व भाजपा नगरसेविका हेतल परमार ( BJP corporator Hetal Parmar ) यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्याचे रूपांतर भांडणात झाले. गीता जैन प्रस्ताव मांडत बोलत असताना त्यांनी पिठासीन अधिकारी म्हणून बसलेले उपमहापौर हसमुख गेहलोत ( Deputy Mayor Hasmukh Gehlot ) यांनाच खडसावले. यावर भाजपा नगरसेविकानी गीता जैन यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यामधूनच गीता जैन आणि भाजपा नगरसेविकांमध्ये वाद झाला. सभागृहात असलेल्या काँग्रेस आणि सेनेच्या नगरसेविका यांनी मध्यस्थी करत बाजूला केले.पिठासीन अधिकारी यांनी सुरक्षा रक्षकांना सभागृहात बोलवून दोन्ही नागरसेविकाना बाजूला केले.

महापालिकेत झालेला गोंधळ

'मी तत्काळ माफी मागितली' :मार्चपासून प्रत्यक्ष महासभा भरवण्यात येत आहे. मात्र मार्चपासून झालेल्या प्रत्येक महासभा वादग्रस्त ठरत आहेत. मागच्या सभेत देखील प्रहार जिल्हा अध्यक्षांनी चहा पाणी न दिल्याने थेट महापौर यांच्या डायसपर्यंत जाऊन गोंधळ घातला. त्यामुळे सभा तहकूब करण्यात आली. तर मंगळवारी झालेल्या सभेत देखील गोंधळ पाहायला मिळाला आहे. ही देखील महासभा अखेर तहकूब करावी लागली. त्यामुळे शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शहरातील महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात येत असते. मात्र सभागृहात नगरसेविका वैयक्तिक पातळीवर टीका करण्यात मग्न झाले आहे. त्यामुळे ज्या मतदारांनी शहराच्या विकासासाठी निवडणूक दिलेल्या लोकप्रतिनिधी काय करतायत हे दिसून आले आहे. माझ्याकडून पिठासीन अधिकारी यांच्याबाबत जे शब्द निघाले. त्यावर मी तत्काळ माफी मागितली. यामध्ये परमार यांना बोलायची गरज नव्हती, असे शिवसेना समर्थक आमदार गीता जैन म्हणाल्या.



पिठासीन अधिकारी यांचा अपमान करण्यात आला आहे. म्हणून सदस्य गीता जैन यांनी शब्द मागे घ्या असे म्हणाले. मात्र त्यांनी माझ्यावर खालच्या पातळीवर टीका केली त्यामुळे मी संतापले, अशी प्रतिक्रिया भाजपा नगरसेविका हेतल परमार यांनी दिली. लोकप्रतिनिधी यांनी सभागृहात असे वागणे योग्य नाही आहे. सत्ताधारी विरोधी पक्षात चर्चेवर वाद होत असतात. मात्र आपल्या शब्दवर मर्यादा असली पाहिजे. परिस्थिती पाहता पिठासीन अधिकारी म्हणून मी संयम बाळगून कोणावर कारवाई केली नाही, अशी माहिती उपमहापौर हसमुख गेहलोत यांनी दिली आहे.

हेही वाचा -डॉ हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणारा दहशतवादी नागपूर एटीएसच्या ताब्यात

Last Updated : May 18, 2022, 3:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details