नवी मुंबई - निवडणुकीपूर्वी नवी मुंबई भाजप मधील मतभेद दूर करण्यासाठी भाजप नेते आशिष शेलार नवी मुंबईत आले. यावेळी त्यांनी आमदार मंदा म्हात्रे व गणेश नाईक यांची भेट घेतली, तसेच मतभेद आणि मनभेदाला भाजपमध्ये थारा नाही, असे वक्तव्ये केले.
हेही वाचा -शहरातील शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांचे फायर ऑडिट करा- प्रशांत दळवी
नवी मुंबई महानगर पालिकेच्या येणाऱ्या निवडणुकांचे नियोजन व सद्यस्थितीत नवी मुंबईत महाआघाडीच्या माध्यमातून सुरू असलेले नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण या संदर्भात समन्वय साधण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार यांनी भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांची वैयक्तिक भेट घेण्यासाठी, तसेच सवांद साधण्यासाठी नवी मुंबईचा दौरा केला. शेलार यांनी भाजप नेते गणेश नाईक, मंदा म्हात्रे, रमेश पाटील हे शक्तीशाली नेतृत्व आहे व आमचा कार्यकर्ता आमच्या पक्षाची ताकत आहे, असे वक्तव्य केले.