महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विनयभंग प्रकरणाला वेगळे वळण.. अपहरणप्रकरणी डीआयजी मोरेंना क्लीनचीट, तरुणीच्या मित्राविरुद्ध पोक्सोंतर्गत गुन्हा - डीआयजी मोरेंना क्लीनचीट

डीआयजी निशिकांत मोरे प्रकरणातील अल्पवयीन तरुणीला देहरादून मधुन तिच्या 19 वर्षीय मित्रासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलीसोबत सापडलेल्या मुलावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या अपहरणाप्रकरणातून मोरे यांना क्लीनचीट मिळाली असून विनयभंगाच्या आरोपाची मात्र सखोल चौकशी होणार आहे.

डीआयजी निशिकांत मोरे प्रकरण
डीआयजी निशिकांत मोरे प्रकरण

By

Published : Jan 15, 2020, 6:30 PM IST

Updated : Jan 15, 2020, 7:44 PM IST

नवी मुंबई - डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप लावणाऱ्या पीडित मुलीला शोधण्यास पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील अल्पवयीन तरुणीला देहरादून मधुन तिच्या 19 वर्षीय मित्रासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलीसोबत सापडलेल्या मुलावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर, तरुणी सापडल्यामुळे अपहरणाप्रकरणी मोरे यांना क्लीनचीट मिळाली असून विनयभंगाच्या आरोपाची मात्र सखोल चौकशी होणार आहे.

पत्रकारपरिषदेत बोलताना पोलीस उपायुक्त अशोक दुधे

डीआयजी निशिकांत मोरे यांनी विनयभंग केलेल्या प्रकरणात विनयभंगाचा आरोप केलेली मुलगी १० दिवसांपासून बेपत्ता होती. तिला १४ जानेवारीला पोलिसांनी देहरादूनमधून तिच्या मित्रासोबत ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. मुलगी आणि तिच्यासोबत सापडलेला मुलगा एकमेकांना ओळखत होते. ५ जानेवारी २०२० रोजी रात्री ३ वाजता खारघरमधून मुलगी आपल्या घरातून निघून गेली होती. यावेळी तिच्यासोबत बॅग असल्याचे सीसीटीव्हीमध्येही दिसले होते. तिने घरातून निघून जाताना एक सुसाईड नोटही लिहिली होती. त्या दिवसापासून पोलीस उपायुक्त अशोक दुधे हे ५ पथकं तयार करुन मुलीचा शोध घेत होते.

हेही वाचा - डीआयजी निशिकांत मोरे विनयभंग प्रकरणातील मुलगी सापडली; आत्महत्येची चिठ्ठी लिहून झाली होती बेपत्ता

घरातून बेपत्ता होऊन सुसाईड नोट लिही. त्यामुळे डीआयजी मोरेला लवकर अटक होईल, असं मित्राने मुलीला सांगितले होते. ठरलेल्या प्लॅननुसार मुलीने 'मी आत्महत्या करीत असून शोधण्याचा प्रयत्न करु नये, माझ्या आत्महत्येस डीआयजी मोरे जबाबदार आहे', असेही सुसाईट नोटमध्ये लिहिले होते. यानंतर, मुलगी ही तिच्या मित्राबरोबर आखलेल्या योजनेप्रमाणे खारघर स्थानकावर गेले. तिथे लोकमान्य टर्मिनसला जाण्यासाठी त्यांनी तिकिट काढले आणि सकाळी ५ वाजता दोघे उत्तरप्रदेशला निघून गेले होते. ज्यावेळी मुलगी बेपत्ता असल्याची बातमी सगळीकडे पसरली त्यावेळी दोघांनी आपली जागा बदलली आणि उत्तर प्रदेशहुन दिल्ली गाठले. दिल्लीला पोहोचल्यानंतर त्याचाकडे पैसे नव्हते त्यामुळे त्याने मुलीच्या गळ्यातील सोन्याची चेन विकली आणि तिथून ते देहरादूनला गेले.

हेही वाचा - वाशी पुलावर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण

7 तारखेला मुलगी बेपत्ता असल्याचा गुन्हा तळोजा पोलीस ठाण्यात नोंद झाली होता. सुसाईड नोट लिहून संबंधित मुलगी घरातून निघून गेली होती. पोलिसांच्या २ पथकांनी मुलगी ज्या ज्या ठिकाणी गेली होती त्या अनुषंगाने तपास केला. यावेळी संबधित मुलगी उत्तरप्रदेश व त्यानंतर उत्तराखंडमधील देहरादून या ठिकाणी गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. ज्या दिवशी संबंधित मुलगी घर सोडून निघून गेली त्या दिवसापासूनच ती एका मुलासोबत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले होते. मुलीसोबत असणारा मुलगाही बेपत्ता असल्याची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. अल्पवयीन मुलगी आणि तिच्यासोबत असणारा मुलगा यांना एकत्रितपणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुलाला पॉस्को कायद्यांतर्गत अटक करण्यात आले आहे. मुलीचे अपहरण केल्याचा ठपका ठेवत मुलाला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ज्या दिवसापासून मुलगा व मुलगी खारघर परिसरातून निघून गेले होते त्या दिवसापासून त्यांनी त्यांचे मोबाईल बंद करून ठेवले होते. तसेच त्यांनी या दरम्यान आपल्या नातेवाईकांनाही कोणत्याही प्रकारे संपर्क केला नव्हता. मात्र, पोलिसांना तांत्रिक तपासाद्वारे या दोघांच्या ठावठिकाण्याची माहिती मिळाली. संबधित मुलगा हा बेपत्ता मुलीच्या कुटुंबीयांच्याही ओळखीचा आहे, असे पोलिसांच्या माध्यमातून सांगाण्यात आले. तसेच डीआयजी मोरे यांचा मुलीच्या बेपत्ता होण्याशी कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या विनयभंगप्रकरणी मोरे फरार असून पोलीस पथक त्यांचा तांत्रिकदृष्ट्या शोध घेत आहेत. मात्र, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी सांगितले.

हेही वाचा - ठाण्यात बच्चे कंपनी रंगली पतंग उडवण्यात

Last Updated : Jan 15, 2020, 7:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details