महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nanavare Couple Suicide Case : ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरण; भावाने 'बोट' छाटून गृहमंत्र्यांना इशारा देताच चार आरोपींना अटक - Home Minister Devendra Fadnavis

ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणी (Nanavare Couple Suicide Case) पोलीस तपासात प्रगती होत नसल्याने धनंजय ननावरे यांनी हाताचे बोट कापत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. पोलीस तपासाला वेग देत नसल्याने त्यांनी दर आठवड्याला शरीराचा एक अवयव सरकारला पाठवणार असल्याचा इशाराही दिला आहे. घटनेची गंभीर दखल घेत आठ आरोपीपैकी चार आरोपींना काही तासातच अटक करून आज न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Nanavare Couple Suicide Case
धनंजय ननावरे

By

Published : Aug 19, 2023, 7:59 PM IST

Updated : Aug 19, 2023, 9:44 PM IST

अर्जुन जयस्वानी यांची प्रतिक्रिया

ठाणे : ननावरे दाम्पत्याच्या आत्महत्येला अठरा दिवस झाल्यानंतर ही पोलीस तपासाला वेग देत नाही. उलट गुन्हे शाखा प्रकरणाच्या तपास गुंडाळण्याचा मागे लागली आहे. यामुळे व्यथित झालेले धनंजय ननावरे यांनी त्यांच्या उजव्या हाताचे एक बोट छाटून ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवत प्रत्येक आठवड्याला शरीराच्या एक एक अवयव छाटून पाठवणार असल्याचा इशारा धनंजय यांनी व्हायरल व्हिडिओ करून दिला होता. त्यानंतर या घटनेची गंभीर दखल घेत आठ आरोपीपैकी चार आरोपींना काही तासातच अटक करून आज न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कमलेश निकम, शशिकांत साठे, नरेश गायकवाड, गणपती कांबळे असे पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहे. तर या घटनेतील मुख्य आरोपी संग्राम निकाळजेसह रणजितसिँह नाईक निबांळ्कर, वकील ज्ञानेश्वर देशमुख , वकील नितीन देशमुख यांना या आदीच अटक पूर्व जामीन मिळाल्याने तूर्तास त्यांना अटक केली नसल्याची माहिती खंडणी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी सांगितले.

दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे यांनी 1 ऑगस्टला पत्नी उज्वलासह राहत्या बंगल्याच्या तीन मजल्यावरील गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे उल्हासनगर मध्ये एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बडे यांनी फिर्याद देत सुरवातीला मुख्य आरोपी संग्राम निकाळजेसह त्याच्या पाच अनोळखी साथीदारांना आरोपी केले.

मात्र त्यानंतर आत्महत्या करण्यापूर्वी ननावरे यांनी आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राहणाऱ्या संग्राम निकाळजे , भाजपचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर, वकील ज्ञानेश्वर देशमुख आणि नितीन देशमुख या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते.

धनंजय ननावरे यांचा व्हायरल व्हिडिओ

पोलिसांनी घटनेच्या दिवशी नंदकुमार ननावरे यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता त्यांच्या खिश्यात एक चिट्ठीही मिळाली होती. या चिठ्ठीत राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा ओमी टीम कलानीचा खासम खास कमलेश निकम, शिंदे गटाचे आमदार किणीकर यांचा स्वीय सहाय्यक शशिकांत साठे, राष्ट्रवादीचा नेते नरेश गायकवाड, गणपती कांबळे यांची ही नावे आढळून आली होती. त्यानंतर व्हिडिओ आणि चिठ्ठीच्या आधारे आठ जणांविरोधात गुन्हा दाखल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मात्र असे असतानाही सातारा जिल्हा भाजप नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर, वकील ज्ञानेश्वर देशमुख, नितीन देशमुख, कमलेश निकम, शशिकांत साठे, नरेश गायकवाड, गणपती कांबळे यांची थेट आरोपी म्हणून नावे न टाकता त्यांना सरंक्षण दिले असल्याची खंत नंदकुमार ननावरे यांचा भाऊ धनंजय ननावरे यांनी व्यक्त सातारा जिल्ह्यातील फलटण येथील राहत्या घरा समोर उजव्या हातचे एक बोट छाटून घेतले. आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

दरम्यानच्या काळात गुन्ह्याचा तपास हा विठ्ठलवाडी पोलिसांकडून काढून घेत ठाणे खंडणी शाखेकडे वर्ग कऱण्यात आला होता.

मात्र मृतकचे भाऊ धनंजय ननावरे हे मागील आठवड्याभरापासून खंडणी विभागातील तपास अधिकाऱ्यांची भेट घेत फॉलअप घेत आहेत. मात्र त्यांना पोलिस अधिकाऱ्यांकडून योग्य ती उत्तर मिळत नसल्याने अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक आठवड्याला शरीराचा एक भाग भेट करणार असल्याचे सांगत हाताचे एक बोट कापत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे. तसेच मोदी सरकारला ह्याच बोटाने मतदान केल्याचे प्रायश्चित म्हणून पहिला अवयव बोट म्हणून पाठवत असल्याचे ननावरे याने व्हिडिओ मध्ये म्हटले आहे.

ठाणे खंडणी विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी सांगितले की, “प्राथमिक तपास आणि धनंजयसह ननावरे कुटुंबीयांच्या जबाबानुसार, ननावरे कुटुंबीयांनी फलटण येथे शेजाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले होते. आरोपी दोन्ही देशमुख वकील दुसऱ्या बाजूचे प्रतिनिधित्व करत होते . खंडणी विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळपर्यत चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक केली यामध्ये अटक केलेल्या आरोपीची नावे असून त्यांचे नावे सुसाईड नोटमध्ये आढळून आली आहेत.

दरम्यान भावाला न्याय देण्यासाठी बोट छाटून घेतलेले धनंजय यांच्याशी संपर्क साधला असता “माझ्या भावाने आत्महत्येच्या एक दिवस आधी एका व्यक्तीला १० लाख रुपये दिले होते. त्याच्या बँक खात्याचे तपशील स्कॅन करताना मला याची माहिती मिळाली. पोलिसांनी याचा तपास करावा, कारण आरोपी पैशासाठीही त्याचा छळ करत होते. पलटण मधील आरोपी संग्राम निकाळजे आणि रणजीतसिंह निंबाळकर त्याला मानसिक त्रास देत होते. अशी माहिती त्यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Thane Crime : बायकोनेच काढला नवऱ्याचा काटा, गळा आवळून केला खून
  2. Thane Crime : 2 वर्षाच्या चिमुरडीवर 15 वर्षीय मुलाचा लैंगिक अत्याचार, वारंवार करत होता असे कृत्
  3. Thane Crime News : कॉलगर्लचा नाद जीवावर बेतला, ४२ वर्षीय व्यक्तीची हत्या; वाचा काय आहे प्रकरण
Last Updated : Aug 19, 2023, 9:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details